अ‍ॅपशहर

मुंबई इंडियन्समध्ये लकी खेळाडूची एंट्री, दोन जेतेपदांनंतर संघाबाहेर गेलेला मॅचविनर परतला

Mumbai Indians IPL 2023 : मुंबई इंडियन्स आता पुढच्या आयपीएलच्या तयारीला लागली आहे. मुंबईने आता आपला एक लकी खेळाडू पुन्हा एकदा संघात घेतला आहे. हा खेळाडू गेले काही सामने आरसीबीकडून खेळला होता. पण मुंबईने आता त्याला आपल्या संघात दाखल केले आहे. मुंबईच्या संघात एंट्री केलेला हा लकी खेळाडू आहे तरी कोण, पाहा....

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 12 Nov 2022, 10:20 pm
मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघाने पुढची आयपीएल जिंकण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईच्या संघाने आता काही खेळाडूंना संघातून काढण्याचा निर्णय घेतला आहे, तर सात खेळाडू त्यांनी कायम ठेवले आहेत. पण आता मुंबईच्या संघात आता एका लकी खेळाडूची एंट्री झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mumbai Indians
सौजन्य-मुंबई इंडियन्स सोशल मीडिया


मुंबई इंडियन्सवर गेल्या मोसमात नामुष्कीची वेळ आली होती. कारण गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात पहिल्यांदा स्पर्धेच्या बाहेर पडला होता. त्यामुळे मुंबईच्या संघाला ट्रोलही करण्यात आले होते. पण हा पराभव आता मुंबई इंडियन्सच्या संघाने मागे टाकला आहे. कारण आता पुढच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. आपल्या संघाच्या दोन जेतेपदांमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूला आता त्यांनी संघात पुन्हा एकदा स्थान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई इंडियन्सने जेव्हा २०१८ आणि २०१९ साली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. तेव्हा मुंबई इंडियन्सच्या संघात एक वेगवान गोलंदाज होता. पण या जेतेपदानंतर त्याला आरसीबीने मुंबईच्या संघातून आपल्याकडे घेतले होते. पण मुंबईच्या संघाने आता आरसीबीकडून पुन्हा एकदा हा खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल केला आहे. मुंबई इंडियन्सने याबाबतची अधिकृत माहितीही दिली आहे. त्यामुळे आता IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सच्या संघात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फला स्थान देण्यात आले आहे. मुंबईसाठी जेसन हा २०१८ आणि २०१९ जेतेपदांमध्ये लकी ठरला होता, असे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाने पुन्हा एकदा जेसनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. त्यामुळे आता जेसन कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

मुंबईच्या संघाने बाहेर काढलेल्या संभाव्य खेळाडूंची यादी
मुख्यतः किरॉन पोलार्ड, फॅब एलन आणि टायमल मिल्स यांची नावे जाहीर झाली असली तरी, याशिवाय अनमोलप्रीत सिंग, मोहम्मद अर्शद खान, मयंक मार्कंडेय, संजय यादव, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, आकाश मधवाल, राहुल बुद्धी आणि मुरुगन अश्विन यांची नावे प्रसिद्ध झाली नाहीत, पण त्यांच्या या यादीमध्ये समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले संभाव्या खेळाडू...रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स आणि टीम डेव्हिड आणि इशान किशन या खेळाडूंच्या नावांचा उल्लेख केला जात आहे ज्यांना मुंबई इंडियन्स संघ आयपीएलसाठी कायम ठेवू शकतो.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख