अ‍ॅपशहर

Team India -अजय जडेजाची बोचरी टीका; रोहितला हा मुद्दा खटकू शकतो, पण संघात...

Team India - भारताच्या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी देखील आपले मत मांडले आहेत. कर्णधार रोहित शर्मावर देखील बोट ठेवत स्पष्टपणे मुद्दे मांडले आहेत.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Nov 2022, 3:26 pm
ॲडलेड: टीम इंडिया टी-२० विश्वचषक २०२२ (T20 WC 2022) मधून बाहेर पडली आहे. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांना इंग्लंडकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय खेळाडू इंग्लंडला कोणत्याही प्रकारे टक्कर देऊ शकले नाहीत. या लाजिरवाण्या पराभवानंतर आता माजी क्रिकेटपटू केवळ टीम इंडियाच्या कामगिरीवर राग काढत नाहीत, तर वर्षभरात संघात होणाऱ्या बदलांवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने कर्णधार बदलण्याबाबत असाच एक प्रश्न वारंवार उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ajay Jadeja On Rohit


यावर्षी भारतीय संघाने अनेक खेळाडूंना कर्णधारपदाची संधी दिली. वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहली कर्णधार होता, त्यानंतर रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी वेगवेगळ्या प्रसंगी कर्णधारपद भूषवले. याबाबत अजय जडेजा म्हणाला की, "घरात एकच वयस्कर व्यक्ती असायला हवी. सात वयस्कर व्यक्ती असल्या तर अडचण निर्माण होते."

वाचा: मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, इमोशनल ट्विट करत म्हणाला...

क्रिकबझशी संवाद साधताना जडेजा म्हणाला, "मी एक गोष्ट सांगेन पण ती गोष्ट तुम्हाला खटकू शकते. एखाद्या कर्णधाराला जर संघ तयार करायचा असेल तर त्याला वर्षभर संघासोबत राहावे लागते. रोहित शर्माने वर्षभरात किती सामन्यांसाठी दौरे केले? ही गोष्ट मी याआधीही सांगितली आहे. तुम्ही टीम बनवली आहे आणि टीमसोबतच नाही आहेत, तर ही गोष्ट अयोग्य आहे."

हेही वाचा: भारताला पराभवाच्या दुःखात ऋषभ पंतचा त्यागाचा विसर, करियर धोक्यात असताना केली मोठी कामगिरी

या विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध शेवटच्या चेंडूंवर विजय मिळवला. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गटात आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांचा पराभव झाला. भारतीय संघ फक्त झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सवर सहज मात करू शकला. फलंदाजीत फक्त विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या प्रभावी ठरले. गट सामन्यांमध्ये गोलंदाजी चांगली होती पण सेमीफायनलमध्ये भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज