अ‍ॅपशहर

तिरंगा घेऊन मैदानात घुसणं महागात पडलं; रोहितच्या भेटीसाठी पोहोचलेल्या चाहत्यासोबत काय घडलं

t20 world cup 2022: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतानं झिम्बाब्वेविरुद्ध २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर १८७ धावांचं आव्हान ठेवलं आहे. सूर्यकुमारनं २५ चेंडूंत ६१ धावांची नाबाद खेळी साकारली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि झिम्बाब्वेच्या संघाला ११५ धावांत गुंडाळून ७१ धावांनी विजय मिळवला.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2022, 6:44 pm
मेलबर्न: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतानं झिम्बाब्वेविरुद्ध २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर १८७ धावांचं आव्हान ठेवलं आहे. सूर्यकुमारनं २५ चेंडूंत ६१ धावांची नाबाद खेळी साकारली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि झिम्बाब्वेच्या संघाला ११५ धावांत गुंडाळून ७१ धावांनी विजय मिळवला. सूर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit sharma


पाचपैकी चार सामने जिंकत भारतानं दुसऱ्या गटात अव्वल स्थान पटकावलं. आता भारताचा सामना उपांत्य फेरीत इंग्लंडशी होईल. १० नोव्हेंबरला दोन्ही संघ आमनेसामने असतील. आजच्या सामन्यात भारतीय संघ क्षेत्ररक्षण करताना एक क्रिकेट चाहता मैदानात शिरला. सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून तो धावत कर्णधार रोहित शर्माच्या जवळ पोहोचला. त्याला पाहून सुरक्षा रक्षक धावत आले. दोन सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं.
सूर्या चमकला! SKYनं केला जबरदस्त विक्रम; कोहली, रोहितलाही जमला नाही 'असा' पराक्रम

रोहित शर्माला भेटण्यासाठी मैदानात धाव घेतलेल्या तरुणाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं. त्या तरुणाच्या हाती भारताचा तिरंगा होता. तरुणाला सुरक्षा रक्षकांनी पकडताच रोहित शर्मा त्यांच्याजवळ गेला. त्या तरुणाला काही करू नका, असं शांतपणे रोहितनं सुरक्षा रक्षकांना सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियावर रोहितचं कौतुक होत आहे. रोहित शर्माच्या भेटीसाठी मैदानात पोहोचलेल्या चाहत्याला ६.५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या सामन्यात सूर्यकुमार आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं ५ बाद १८६ धावा केल्या. सूर्यकुमारनं स्पर्धेतील तिसरं तर लोकेश राहुलनं दुसरं अर्धशतक झळकावलं. यानंतर भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत झिम्बाब्वेच्या फलंदाजीला धक्के दिले. वेगवान गोलंदाजांनी आघाडीच्या फलंदाजांना लवकर बाद केलं. त्यानंतर अश्विननं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी, हार्दिक पांड्यानं प्रत्येकी दोन, तर भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंगनं प्रत्येकी एक गडी बाद केला
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख