अ‍ॅपशहर

मॅच झाल्यावर विराट झाला भावनिक, डोळ्यात अश्रू आणि उच्चारले ते शब्द

Virat Kohli Match Winner: विराट कोहली आजच्या विजयाचा शिलेदार ठरला. त्याच्या घातक फलंदाजीने भारताला पाकिस्तानचा बदल घेण्यासाठी हातभार लावला. या विजयानंतर विराट कोहलीनंतर विराटने काय केले आणि काय म्हणाला जाणून घ्या.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2022, 12:02 pm
मेलबर्न: भारतीय संघाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आज दणक्यात दिवाळी साजरी केली. तब्बल ९० हजार लोकांच्या साक्षीने खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तानच्या सामन्यात भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय कायम स्मरणात राहील. या भारताच्या विजयाचा खरा शिलेदार ठरला तो म्हणजे किंग कोहली. आज खऱ्या अर्थानं विराट कोहलीने दाखवून दिलं की क्रिकेटचा किंग नेमका कोण आहे. कोहलीने हार्दिकच्या मदतीने शतकी भागीदारी रचली आणि वेगाने धावा जमवत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Virat Kohli Matchwinner  (1)


पाकिस्तानविरुद्ध भारताची निराशाजनक सुरवात झाल्यावर भारताच्या धावांना उचलून धरण्याचं काम केलं ते विराटनं. कोहलीने सुरुवातीपासूनच मैदानावर आपला जॅम बसवायला सुरुवात केली. जेव्हा इतर खेळाडू आऊट होत होते, तेव्हा विराट मैदानावर आपले बस्तान मांडण्यात व्यस्त होता. कोहली हार्दिकच्या मदतीने चांगलाच स्थिरावला. पण एकदा स्थिरस्थावर झाल्यावर मात्र कोहलीने हा सामना सोडला नाही. कारण कोहलीने त्याने एकामागून एक धडाकेबाज फटकेबाजी केली आपले अर्धशतक सादर केले. त्यानंतर कोहली थांबला नाही. कोहलीने त्यानंतरही आपली आक्रमक फटकेबाजी कायम ठेवली. कोहलीने अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फटकेबाजी केली.

कोहलीच्या फटकेबाजीचे तुफान जणू नेत्रदीपक असेच होते. आपला अनुभव विराटने यावेळी कामी आणला आणि त्यामुळेच यावेळी भारताला विजय मिळवता आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विराट हाच या सामन्याच्या मॅचविनर ठरला. विराटने ५३ चेंडूत ८२ धावा खेचत भारताला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात कोहलीने लगावलेला षटकार भारतासाठी मॅचविनिंग ठरला. शेवटच्या चेंडूवर अश्विनसोबत एक धाव काढत संघाने विजयाची फटाके फोडले.

सामना जिंकल्यानंतर कोहलीने हेल्मेट काढले आणि आकाशाकडे बघत डोळे घट्ट मिटले आणि या विजयाच्या शिलेदाराच्या डोळ्यातून हलकेच अश्रू दाटून आले होते. या विजयानंतर कोहली म्हणाला, "हे खरोखरंच अविश्वसनीय आहे, माझ्याकडे शब्द नाहीत, हे कसे घडले याची कल्पनाही नाही. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत. शेवटपर्यंत आपण टिकून राहिलो तर आपण लक्ष्य पूर्ण करू शकतो, असा विश्वास हार्दिकला होता. हॅरिस हा त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे आणि मी ते दोन षटकार मारले. हिशोब साधा होता. नवाजला एक षटक टाकायचे होते, त्यामुळे मी हॅरिसला जर शॉट्स मारले तर ते घाबरतील.

८ बॉलमध्ये २८ वरून ते ६ बॉलमध्ये १६ धावांपर्यंत खाली आणले. मी माझ्या अंतःप्रेरणेला चिकटून राहण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत मोहाली ही माझी ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम खेळी होती. आज मी या खेळीला बेस्ट इनिंग मानतो. हार्दिक मला सारखा पुश करता राहिला. स्टेडियममधील गर्दी अभूतपूर्व होती. तुम्ही लोक (चाहते) पाठीशी होतात आणि तुमच्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे."
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख