अ‍ॅपशहर

टी-२० वर्ल्ड कपमधला सर्वात धक्कादायक निकाल, दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेला संघ स्पर्धेबाहेर!

West Indies knock out of T20 World Cup-आयर्लंडने दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला आणि वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषकातून बाद झाला आहे. पॉल स्टारलिंगची विध्वंसक फलंदाजी निकोलस पूरनच्या संघावर भारी पडली.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Oct 2022, 1:24 pm
होबार्ट: दोन वेळा टी-२० विश्वचषक चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिज संघाला गटातील दुसऱ्या पराभवासह टी-२० विश्वचषकातून लाजिरवाणा निरोप मिळाला आहे. इंडिजला शेवटच्या गट सामन्यात आयर्लंडने ९ गडी राखून सुपर-१२ गाठण्यापासून रोखले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ireland knocks west indies out


निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या विंडीज संघाकडून फारशा अपेक्षा नसल्या तरी आयर्लंडने त्यांना हरवून इतिहास रचला. हा सामना जिंकून आयर्लंडने सुपर-१२ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे.


वाचा : भारत- पाक सामन्यापूर्वीच या खेळाडूच्या डोक्याला लागला बॉल, हॉस्पिटलमध्ये केले दाखल; पाहा

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या विंडीज संघाची सुरुवात खूपच खराब झाली. मेयर्सच्या रूपाने त्यांना तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. यानंतर, ५व्या षटकात, मागील सामन्याचा नायक चार्ल्सने अवघ्या २४ धावा केल्या. आज आयर्लंडचे खेळाडू वेगळ्याच अंदाजात दिसत होते. त्यांची गोलंदाजी जबरदस्त होती आणि विंडीजच्या बलाढ्य फलंदाजांना प्रत्येक धावांसाठी तळमळत राहावे लागले. यामुळेच कॅरेबियन खेळाडू धावा गोळा करण्याचा वेगात क्रीझवर येताच तंबूत परत जाऊ लागले.

हेही वाचा : बाप कामगिरी! T20 World Cup मध्ये भारत- पाकिस्तानमध्ये झाले ६ सामने, जाणून घ्या इंडियाचा रेकॉर्ड

एविन लुईसही १३ धावा करून बाद झाला, कर्णधार निकोलस पूरनची बॅटही शांत राहिली. तो १३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रोमन पॉवेल ६ धावांवर डेलेनीचा बळी ठरला. अर्थात, ब्रेंडन किंग आणि ओडियन स्मिथ यांनी शेवटी काही चांगले शॉट्स खेळले. किंगने ४८ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार लगावत नाबाद ६२ धावा केल्या, तर स्मिथच्या नावावर १२ चेंडूत नाबाद १९ धावा होत्या. आयर्लंडकडून डेलानीने ३ विकेट चटकावले.


वााचा : Photo-पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची खास तयारी, BCCI ने चाहत्यांना दाखवली झलक

आयर्लंडने असा इतिहास रचला

१४७ धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडचीही सुरुवात खराब झाली. पॉल स्टारलिंग आणि कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने अवघ्या ७.३ षटकांत७३3 धावा केल्या. मात्र, कर्णधार २३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावा करून बाद झाला. यानंतरही धावांच्या वेगांमध्ये कोणता ब्रेक लागलाच नाही. पॉल स्टारलिंग आणि लॉर्कन टकर यांनी दोन्ही बाजूंनी मैदानात जणू धुमाकूळ घातला.
पॉल स्टारलिंगने ४८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६६ धावा केल्या, तर टकरने ३५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४५ धावा करत इतिहास रचला.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख