अ‍ॅपशहर

हार्दिक पंड्याच्या त्या एकाच वाक्याने साकारला भारताचा विजय, विराटने सांगितले रहस्य

Virat Kohli : भारताने या सामन्यात विजय साकारला तो विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांच्यामुळे. पण या लढतीत हार्दिकने एक वाक्य कोहलीला सांगितले होते आणि ते एक वाक्य भारतासाठी सामना जिंकवून देणारे ठरले. हार्दिकने यावेळी नेमकं काय सांगितलं होतं, सामना संपल्यावर विराटने ते रहस्य सर्वांना सांगितले, पंड्या काय म्हणाला होता, पाहा....

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 23 Oct 2022, 6:41 pm
मेलबर्न : विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांच्यामुळे भारताला हा विजय साकारता आला. पण या दोघांची भागीदारी सुरु असताना हार्दिक पंड्या एकच वाक्य विराट कोहलीला म्हणाला होता आणि त्या एकाच वाक्याने भारताला हा विजय मिळवता आला, हे रहस्य आता विराट कोहलीने सर्वांना सामना संपल्यावर सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम T 20 WORLD CUP
सौजन्य-ट्विटर


भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. भारताचे चार फलंदाज झटपट बाद झाले आणि त्यानंतर विराट व हार्दिक यांची जोडी जमली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदाकी रचली. पण ही भागीदारी रचत असताना हार्दिकने एकच गोष्ट विराटला सांगतली आणि त्यामुळेच भारताला यावेळी विजय मिळवता आला.

विराट कोहली सामन्यानंतर सांगितले की, " खरंतर मला आता काय बोलायचं हे समजत नाही. कारण माझ्याकडे या विजयासाठी काहीच शब्द नाहीत. पण मला एक हार्दिक पंड्याचे वाक्य अजूनही आठवते. आमची जेव्हा भागीदारी सुरु होती. त्यामुळे तो मला म्हणाला की, माझ्यावर विश्वास ठेव, हा सामना आपण अखेरपर्यंत घेऊन जाऊ आणि तरच आपल्याला विजय मिळवता येईल. हार्दिकने जे काही सांगितले ते मी ऐकले आणि त्यानुसार आम्ही खेळत गेलो. त्यानंतर कोणत्या गोलंदाजाचीी कशी धुलाई करायची, हे आम्ही ठरवले. पण माझ्यामते हार्दिकने जे मला सांगितले, त्याचा यावेळी मोठा परीणाम माझ्यावर झाला. त्यानुसार आम्ही रणनिती आखली आणि अखेरच्या षटकापर्यंत आम्ही दोघे एकत्र राहू शकलो. माझ्यासाठी त्याचे हे वाक्य महत्वाचे होते."

विराटने या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि अखेरपर्यंत तो सामन्यात टिकून राहीला. पण हार्दिक अखेरच्या षटकाच्या पहिल्याच ेचंडूवर बाद झाला. पण या दोघांनी अखेरच्या षटकापर्यंत सामना नेला आणि विजयाची आशा कायम ठेवली. त्यामुळे हा विजय भारतासाठी महत्वाचा असेल. त्याचबरोबर हार्दिकने जे विराटला सांगितले तेदेखील सर्वात महत्वाचे होते. कारण अशा सामन्यांंमध्ये आपली काय रणनिती आहे, हे अशा वाक्यांतून पुढे येत असते.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख