अ‍ॅपशहर

श्रीलंका दौरा: भारतीय संघ जाहीर, युवराज सिंगला स्थान नाही

श्रीलंकेत २० ऑगस्टला सुरू होत असलेली एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-२० सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली. या संघात भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगला स्थान देण्यात आलेले नाही. तर, दुसरीकडे मनीष पांडे याचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.

Maharashtra Times 13 Aug 2017, 9:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम team india for idi series in sri lanka announced
श्रीलंका दौरा: भारतीय संघ जाहीर, युवराज सिंगला स्थान नाही


श्रीलंकेत २० ऑगस्टला सुरू होत असलेली एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-२० सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली. या संघात भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगला स्थान देण्यात आलेले नाही. तर, दुसरीकडे मनीष पांडे याचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.

युवराज सिंगने गेल्या ६ वनडे सामन्यांमध्ये फक्त १०९ धावा केल्या होत्या. कदाचित याच कारणामुळे युवराजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडून मर्यादित षटकांच्या या मालिकेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दुखापतीमुळे जूनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपासून दूर राहिलेला के. एल. राहुल याचे पुनरागमन झाले आहे. हा २५ वर्षीय फलंदाज जानेवारीनंतर एकही वनडे खेळलेला नाही.

३५ वर्षीय युवराज सिंगने जूनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरुद्ध ३२ चेंडूंत ५३ धावा केल्या होत्या. परंतु, त्यानंतर तीन डावांमध्ये त्याने केवळ ७, २३ नाबाद आणि २२ धावा केल्या होत्या. त्यानंतर तो वेस्ट इंडीजविरुद्ध पाच वनडे सामने खेळला होता. यात त्याचा ३९ धावांचा सर्वोच्च स्कोअर होता. मुंबईचा पेसर शार्दुल ठाकूर या मालिकेत पहिल्यांदाच खेळतोय. मालिकेतील पहिला सामना २० ऑगस्ट, दुसरा सामना २४, तिसरा २७, चौथा ३१ आणि पाचवा सामना ३ सप्टेंबरला होणार आहे.

अशी असेल टीम इंडिया:

विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल. राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज