अ‍ॅपशहर

दस का दम!; आयपीएल सुरू

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला आज येथील राजीव गांधी स्टेडियमवर दिमाखदार सोहळ्याने सुरुवात झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग या दिग्गजांचा यावेळी आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आल्याने हा सोहळा 'व्हेरी व्हेरी स्पेशल' ठरला.

Maharashtra Times 5 Apr 2017, 8:58 pm
मटा ऑनलाइन वृत्त । हैदराबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ten seasons of ipl begins
दस का दम!; आयपीएल सुरू


आयपीएलच्या दहाव्या मोसमाला आज येथील राजीव गांधी स्टेडियमवर दिमाखदार सोहळ्याने सुरुवात झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग या दिग्गजांचा यावेळी आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आल्याने हा सोहळा 'व्हेरी व्हेरी स्पेशल' ठरला.

सलामीच्या लढतीत आज गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादची गाठ उपविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी पडली असून टॉस जिंकून बेंगळुरूने प्रथम हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.



आयपीएलच्या रणांगणात आठ संघांमध्ये घमासान होत असून यंदाच्या मोसमाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व संघांच्या होम ग्राउंडवर सलामीच्या लढतींआधी उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

बेंगळुरू वि. हैदराबाद सामन्याचे लाइव्ह स्कोअरकार्ड

सचिन तेंडुलकरने आयपीएलचं आज विशेष कौतुक केलं. सचिन म्हणाला, आयपीएल इतका मोठा पल्ला गाठेल असं मला जराही वाटलं नव्हतं मात्र आयपीएलने आज क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

The #IPL iconic cricketers felicitated ahead of the opening game - @sachin_rt @SGanguly99 @VVSLaxman281 @virendersehwag pic.twitter.com/xIHjYsmARe — IndianPremierLeague (@IPL) April 5, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज