अ‍ॅपशहर

सोशल मीडियावर ट्रोलिंग; सानिया मिर्झा भडकली

वर्ल्डकपमधील भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यावर ट्रोलर्सकडून जोरदार टीका सुरू आहे. या टीकेला आता सानियानेही उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2019, 10:40 am
मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sania-mirza


वर्ल्डकपमधील भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यावर ट्रोलर्सकडून जोरदार टीका सुरू आहे. या टीकेला आता सानियानेही उत्तर दिले आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यात शोएब मलिक शून्यावर त्रिफळाचीत झाला. शोएब आणि पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीसाठी रात्री झालेली पार्टी जवाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनी केला आहे. त्याचा एक व्हिडिओही वायरल होत आहे.



शोएबने आता क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारावी असाही सूर पाकच्या क्रिकेट चाहत्यांनी आवळला आहे. शोएब मलिकवर होणारी टीका सानिया मिर्झाला सहन झाली नाही. तिनेही काही ट्रोलर्सना उत्तर दिले. आमच्यासोबत एक लहान मुलगा असताना, आमच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ शूट केला. त्यासाठी आमची परवानगीदेखील घेतली नाही आणि तुम्हाला अडवल्यानंतर तुम्ही असा अपप्रचार करायला लागलात? असा प्रतिप्रश्न सानियाने केला.


ही पार्टी नव्हती तर डिनर होते आणि खेळाडू एखादा सामना हरले तरी त्यांना बाहेर जाण्याची आणि जेवण्याची परवानगी आहे. मुर्खांचा गोतावळा जमला आहे असे म्हणत पुढील वेळी चांगल्या कंटेटसह प्रयत्न करावा असा टोलाही सानियाने लगावला.

पाकिस्तानसोबत भारतीय क्रिकेट चाहत्यांनी देखील शोएब मलिकला ट्रोल केले. काहींनी टीकटॉकचाही आधार घेतला.







एका ट्विटर युजरने सानियाला एका वेगळ्या ट्विटने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.



सानियाने या युजरला चांगलेच सुनावले. अनेकदा ट्विटरमुळे मला पोट धरून हसण्याची संधी मिळते. विशेषत: तुमच्यासारख्या लोकांमुळे. आपला राग, वैफल्य बाहेर काढण्यासाठी अन्य पर्यायांचा वापर करा, असेही सानियाने ट्विटर युजरला खडसावले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज