अ‍ॅपशहर

Ball Tampering: शिक्षा खूपच कठोर- डुप्लेसिस

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथवरील एका वर्षाची बंदीची शिक्षा फारच कठोर असल्याचे मत दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने व्यक्त केले आहे.

Maharashtra Times 30 Mar 2018, 9:21 am
वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम faf


ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथवरील एका वर्षाची बंदीची शिक्षा फारच कठोर असल्याचे मत दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने व्यक्त केले आहे.

स्मिथबद्दल जे काही झाले त्याचे मला वाईट वाटले. त्याला पाठिंबा दर्शविणारा संदेशही मी त्याला पाठविला असल्याचे डुप्लेसिसने पत्रकार परिषदेत सांगितले. डुप्लेसिस म्हणाला, 'हा आठवडा फारच अवघड गेला. स्मिथ सध्या कुठल्या परिस्थितीतून जात असेल, हे मी समजू शकतो. ती एक चांगली व्यक्ती आहे. पण नको त्या ठिकाणी तो सापडला. माझ्या मनात त्याच्या विषयी विशेष स्थान आहे. पुढील काही दिवस त्याच्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे, म्हणूनच मी त्याला सांत्वनपर संदेश पाठविला.' डुप्लेसिसदेखील दोन वेळा चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. पण, त्याच्यावर बंदी न घालता केवळ दंड ठोठावण्यात आला होता. स्मिथविषयी सहानुभूती असली, तर लढत जिंकण्याचे आपले काम चोख पार पाडणार असल्याचेही डुप्लेसिसने सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज