अ‍ॅपशहर

Ball tampering : 'हा तर सावधानतेचा इशारा'

कोलकाता : ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट मालिकेदरम्यान घडलेले चेंडू छेडछाड प्रकरण हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीच सावधानतेचा इशारा असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचा प्रशिक्षक जॅक कॅलिसने व्यक्त केले आहे. या प्रकरणावर आतापर्यंत क्रिकेटविश्वात, तसेच प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली आहे. त्यामुळे जगभरातील खेळाडूंना मैदानावर चेंडू हाताळताना अधिक काळजी घेण्याचा धडा मिळाला असेल. हा सावधानतेचा इशारा असून येथून पुढे निकोपपणे क्रिकेट खेळले जाईल, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी, असेही कॅलिस म्हणाला.

Maharashtra Times 2 Apr 2018, 8:07 am

महाराष्ट्र टाइम्स.कॉम this warning alert for the international cricket
Ball tampering : 'हा तर सावधानतेचा इशारा'

चूक माझीच : कँडिस वॉर्नर

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरकडून घडलेल्या चेंडू छेडछाडीच्या प्रमादामागील खरी चूक माझीच आहे, अशी कबुली वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नरने रविवारी दिली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सहन कराव्या लागलेल्या टोमण्यांमुळेच हा प्रकार घडला, असे कँडिस म्हणाली. ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये चेंडू छेडछाड प्रकरण घडले. तत्पूर्वी, दुसऱ्या कसोटीदरम्यान आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांच्यामध्ये वादावादी झाली होती. क्विंटनने त्यावेळी वॉर्नरच्या पत्नीला उद्देशून आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. चेंडू छेडछाडीच्या प्रकरणाला कुठेतरी ही पार्श्वभूमी कारणीभूत असल्याचे मत कँडिसने व्यक्त केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज