अ‍ॅपशहर

पेप्सीची जाहिरात करण्यास विराटचा नकार

'जर मी पेप्सी पित नसेल तर मी इतरांना पेप्सी प्यायला का सांगू?.' असं सांगत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पेप्सीची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. या जाहिरातीला नकार दिल्यानं विराटनं कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडलं आहे.

Maharashtra Times 16 Sep 2017, 3:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम to practice what he preaches kohli drops pepsi fairness products
पेप्सीची जाहिरात करण्यास विराटचा नकार


'जर मी पेप्सी पित नसेल तर मी इतरांना पेप्सी प्यायला का सांगू?.' असं सांगत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पेप्सीची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. या जाहिरातीला नकार दिल्यानं विराटनं कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडलं आहे.

पेप्सिको आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात सहा वर्षापासून जाहिरातीसंबंधीचा करार होता. या दोघांमधील करार ३० एप्रिल रोजी संपला आहे. कंपनी विराटसोबत पुन्हा करार करण्यास उत्सुक होती परंतु विराट कोहलीनं करार करण्यास नकार दिला. विराटनं जूनमध्ये एका मुलाखतीत यांचे संकेत दिले होते. बरेच उत्पादनं आहेत त्याचा वापर आधी मी करायचो परंतु आता करीत नाही. जर मी या उत्पादनाचा वापर करीत नसेल तर पैशांसाठी लोकांना ही उत्पादनं वापरायला का सांगू?, असं विराटनं त्या मुलाखतीत म्हटलं होतं.

विराटनं पेप्सी तसेच सौंदर्य उजळवणाऱ्या क्रिम उत्पादनाची जाहिरात करण्यासही नकार दर्शवला आहे. विराट सध्या ऑडी कार, एमआरएफ, प्युमा, बूस्ट, कोलगेट आणि विक्स या उत्पादनाची जाहिरात करीत आहे. पेप्सीची जाहिरात करण्यास विराटनं नकार दिला असला तरी विराटची खास मैत्रिण अनुष्का शर्मा निंबूज मसाला सोडाची जाहिरात करताना दिसणार आहे. सचिन तेंडुलकर क्वाकर ओट्स, हृतिक रोशन माउंटेन ड्यूची जाहिरात करतात. जाहिरात करण्यासाठी कोहलीची एका दिवसाची फी ४.५ कोटी ते ५ कोटी इतकी आहे. गेल्यावर्षी ही फी २.५ ते ४ कोटी रुपये होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज