अ‍ॅपशहर

टॉम यांनी घेतली होती सचिनची मुलाखत

दिवंगत अभिनेते टॉम अल्टर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी पत्रकार म्हणून त्यांच्या करियरची सुरूवात केली होती. त्याकाळात त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलाखत घेतली होती. सचिनची मुलाखत घेणारे ते पहिले पत्रकार होते.

Maharashtra Times 30 Sep 2017, 5:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tom alter took first video interview of sachin tendulkar
टॉम यांनी घेतली होती सचिनची मुलाखत


दिवंगत अभिनेते टॉम अल्टर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी पत्रकार म्हणून त्यांच्या करियरची सुरूवात केली होती. त्याकाळात त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलाखत घेतली होती. सचिनची मुलाखत घेणारे ते पहिले पत्रकार होते.

१९८९ची ही गोष्ट. तेंव्हा सचिन अवघ्या १५ वर्षाचा होता आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरूवातही झाली नव्हती. सचिनचा भारतीय संघातही समावेश झालेला नव्हता. पण सचिनची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड होणार असल्याची चर्चा मात्र होती. तेंव्हा टॉम अल्टर यांनी सचिनची पहिली व्हिडिओ मुलाखत घेतली होती.

'टाइम्स ऑफ इंडिया'साठी २०१३ मध्ये ही मुलाखत घेण्यात आली होती. १९९८ मध्ये सुनील गावस्कर यांनी टॉम यांच्याकडे मुंबईचे दोन फलंदाज सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर यांचा उल्लेख केला होता. तसेच वेंगसरकरनीच त्यांना १५ वर्षाच्या सचिनची ओळख करुन दिली. 'सचिन खूप हळू आवाजात बोलत होता. तो लाजाळू होता. पण त्याचात आत्मविश्वास होता', असं टॉम यांनी भेटीनंतर म्हटलं होतं.

या मुलाखतीबद्दल त्यांनी एक मजेदार किस्साही सांगितला होता. सचिन लवकरचं भारतासाठी क्रिकेट खेळणार आहे. तो ऑफ स्टम्प बाहेरील चेंडू जोरात मारतो आणि ऑफ साइडला बाद होतो, अशी सचिनची खूबी वेंगसरकरने सांगितली होती, असंही टॉम यांनी नमूद केलं होतं. २००५ मध्ये टॉम यांची सचिनशी पुन्हा भेट झाली होती. तेंव्हा सचिनमध्ये खूपच बदल झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सचिन पूर्वीपेक्षा अधिक बोलका वाटत होता. पण त्याच्या बोलण्याची शैली मात्र तिच होती, असंही टॉम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सचिन तेंडुलकरने ट्विट करून अभिनेते टॉम अल्टर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचा फोटोही सचिनने ट्विट केला.


Through my first ever TV interview, met a true sports lover and a good human being. You will live in our hearts forever. RIP #TomAlter pic.twitter.com/BJ0fjqaSzM — sachin tendulkar (@sachin_rt) September 30, 2017  

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज