अ‍ॅपशहर

'विराट' पराक्रम, ब्रॅडमनचाही विक्रम मोडला

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने धडाकेबाज द्विशतक ठोकले आहे. या दमदार खेळीबरोबरच विराटचे या वर्षातील आणि कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे द्विशतक ठरले असून त्याने सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले आहे. विराटपाठोपाठ जयंत यादवने ही शतकी खेळी केली. तो १०४ धावांवर बाद झाला.

Maharashtra Times 11 Dec 2016, 1:12 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat kohali scores third double hundred
'विराट' पराक्रम, ब्रॅडमनचाही विक्रम मोडला

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने धडाकेबाज द्विशतक ठोकले आहे. या दमदार खेळीबरोबरच विराटचे या वर्षातील आणि कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे द्विशतक ठरले असून त्याने सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले आहे. विराटपाठोपाठ जयंत यादवने ही शतकी खेळी केली. तो १०४ धावांवर बाद झाला.

इंग्लंडविरूद्घच्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस होता. काल नाबाद शतकी खेळी केल्यानंतर आज विराटने १४७ धावांवरून फलंदाजीला सुरूवात केली आणि ३०२ चेंडूत तडाखेबाज २०० धावा ठोकल्या. २३ चौकारांची आतषबाजी करत त्याने ही द्विशतकी खेळी केली आहे. यावेळी जयंत यादवची त्याला दमदार साथ मिळाली. या दोघांनी २०० धावांची भागिदारी करत ऐन थंडीत इंग्लंडच्या गोलंदाजांचा घामटा काढला.

२०१२ मध्ये कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कने कसोटी मालिकेत वर्षात चार द्विशतक ठोकले होते. त्याशिवाय न्यूझीलंडच्या ब्रॅडमन मैकलम यानेही वर्षात तीन शतके केली होती. आता या यादीत विराटचे नाव आले असून त्याने सर डॉन ब्रॅडमन यांचा द्विशतकी खेळीचा विक्रम मोडीत काढला आहे. ब्रॅडमन यांनीही कसोटी मालिकेत वर्षात दोन द्विशतक ठोकले होते. या आधी विराटने जूलैमध्ये वेस्ट इ्ंडीज विरोधात २०० धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरोधात २११ धावा कुटल्या होत्या. आता त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढत हे द्विशतक झळकावले आहे.

२३१ धावांची आघाडी

आज दिवस अखेर भारताचा डाव ६३१ धावांवर आटोपला असून भारताने इंग्लंडवर २३१ धावांची आघाडी घेतली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज