अ‍ॅपशहर

विराट हे गांगुलीचे अपग्रेडेड व्हर्जन: सेहवाग

मैदानावर कायम आक्रमक असलेल्या कर्णधार विराट कोहलीचं टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यानं कौतुक केलं आहे. त्यानं कोहलीची तुलना सौरव गांगुलीशी केली आहे. कोहली हे गांगुलीचेच अपग्रेडेड व्हर्जन आहे, असं त्यानं म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2018, 2:39 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat-and-ganguly


मैदानावर कायम आक्रमक असलेल्या कर्णधार विराट कोहलीचं टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यानं कौतुक केलं आहे. त्यानं कोहलीची तुलना सौरव गांगुलीशी केली आहे. कोहली हे गांगुलीचेच अपग्रेडेड व्हर्जन आहे, असं त्यानं म्हटलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत वन-डे मालिका जिंकून इतिहास रचणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. वीरेंद्र सेहवागनंही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याची स्तुती केली आहे. कोहलीच्या आक्रमक स्वभावाची तुलना गांगुलीशी करू शकता. कोहली हे गांगुलीचेच अपग्रेडेड व्हर्जन आहे, असं तो म्हणाला.

कोहलीची तुलना भारताच्या माजी कर्णधारांशी करणं सध्या तरी योग्य वाटत नाही. मालिका विजयाबाबत म्हणाल तर तो अव्वल आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघानं गेल्या आठ मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. कर्णधार आणि त्याची कामगिरी पाहिली तर तो एक उत्तम कर्णधार आहे. मात्र, त्याची तुलना माजी कर्णधारांशी करणं योग्य नाही. तुलना करायची झाल्यास त्यासाठी त्याला थोडा वेळ देणं गरजेचं आहे किंवा अनुभवाची गरज आहे, असंही सेहवागनं स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज