अ‍ॅपशहर

विराटला हवी खेळाडूंसाठी पगारवाढ

क्रिकेटच्या अतिव्यग्र वेळापत्रकावर टीका केल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आता संघातील सहकाऱ्यांच्या पगारवाढीसाठी दंड थोपटले आहेत. पगारवाढीबरोबरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नफ्यात खेळाडूंना मिळणारा वाटाही वाढवून द्यावा, अशी मागणी त्यानं केल्याचं सूत्रांकडून समजतं.

Maharashtra Times 28 Nov 2017, 4:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat kohli leads pay rise call for india cricketers
विराटला हवी खेळाडूंसाठी पगारवाढ


क्रिकेटच्या अतिव्यग्र वेळापत्रकावर टीका केल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आता संघातील सहकाऱ्यांच्या पगारवाढीसाठी दंड थोपटले आहेत. पगारवाढीबरोबरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नफ्यात खेळाडूंना मिळणारा वाटाही वाढवून द्यावा, अशी मागणी त्यानं केल्याचं सूत्रांकडून समजतं.

टीम इंडियातील टॉप खेळाडूंच्या कमाईत दुपटीनं वाढ होऊन ही कमाई सध्या ३ लाख डॉलर म्हणजेच, जवळपास २० कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. येत्या शुक्रवारी नवी दिल्लीत बीसीसीआयसोबत भारतीय संघाची बैठक होणार आहे. या बैठकीत खेळाडूंच्या वतीने विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री पगारवाढ व इतर मागण्या मांडणार असल्याचं समजतं.

मागील सप्टेंबरमध्ये बीसीसीआयनं आयपीएलच्या प्रसारणासाठी माध्यमसम्राट रुपर्ट मर्डाक यांच्या मालकीच्या स्टार इंडिया वाहिनीसोबत २०१८ ते २०२२ असा पाच वर्षांचा करार केला आहे. या करारापोटी बीसीसीआयला स्टार इंडियाकडून २.५ अब्ज डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे.

कामगिरीच्या आधारे भारतीय संघातील खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात येते. या श्रेणीनुसार खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्यात येतो. यापूर्वीच्या कराराची मुदत सप्टेंबर २०१७ मध्ये संपली आहे. त्यामुळं आता बीसीसीआय खेळाडूंसोबत नवा करार करणार आहे. स्टार इंडियाशी झालेल्या आयपीएलच्या कराराच्या पार्श्वभूमीवर हा करार होत असल्यानं त्यात नफ्यातील वाटा वाढवून मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं समजतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज