अ‍ॅपशहर

विराट कोहलीचं शतकांचं 'अर्धशतक'

भारतीय क्रिकेट संघातील 'रनमशीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीनं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात आज त्यानं शतकी खेळी करून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शतकांचं 'अर्धशतक' ठोकलं आहे. कसोटीतील हे त्याचं १८ वं शतक आहे.

Maharashtra Times 20 Nov 2017, 3:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat kohli slams 50th international century 18th in test cricket
विराट कोहलीचं शतकांचं 'अर्धशतक'


भारतीय क्रिकेट संघातील 'रनमशीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीनं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात आज त्यानं शतकी खेळी करून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शतकांचं 'अर्धशतक' ठोकलं आहे. कसोटीतील हे त्याचं १८ वं शतक आहे.

विराटनं ऑगस्ट २००८ मध्ये एकदिवसीय संघात पदार्पण केलं. ९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यानं अनेक विक्रम नावावर केले. एकदिवसीय कारकिर्दीत त्याच्या नावावर ३२ शतकं आहेत. तर कसोटी कारकिर्दीतील त्याचं हे १८ वं शतक आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अतिशय संथगतीनं झाली. २०१० नंतर त्याची फलंदाजी खऱ्या अर्थानं बहरली. २०१० मध्ये त्यानं तीन शतकं आणि सात अर्धशतकं ठोकली आणि कसोटी संघात जागा निश्चित केली. कसोटी क्रिकेट खेळताना तो सुरुवातीला धडपडला. अनेक माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटरसिकांनी त्याच्यावर टीका केली. पण न डगमगता त्यानं खेळ सुरूच ठेवला. २०१२ नंतर त्यानं फलंदाजीतील 'गिअर' बदलला आणि त्यावर्षी त्यानं चमकदार कामगिरी केली. कसोटीत आता त्याच्या नावावर तब्बल १८ शतके आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची ३२ शतके आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिननंतर तो सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे.

या शतकी खेळीबरोबरच विराटने माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दोघांनीही कर्णधार म्हणून प्रत्येकी ११ शतकं केली आहेत. अझरुद्दीनने ९ तर सचिननं ७ शतकं झळकावली आहेत. महेंद्रसिंह धोनी, पतौडी आणि सौरव गांगुली यांच्या नावावर कर्णधार म्हणून प्रत्येकी पाच शतकं आहेत.

विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज