अ‍ॅपशहर

विराटचा नवा विक्रम; 'पुमा'शी १०० कोटींचा करार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या मैदानावरील यशासोबतच त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यूही कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. क्रीडा साहित्य निर्मितीतील एक आघाडीची कंपनी असलेल्या 'पुमा' कंपनीशी विराटनं नुकताच ११० कोटी रुपयांचा करार केला आहे. एकाच कंपनीसोबत इतक्या मोठ्या रकमेचा करार करणारा विराट हा पहिला क्रीडापटू ठरला आहे.

Digbijay Mishra | Maharashtra Times 20 Feb 2017, 11:47 am
टाइम्स न्यूज नेटवर्क । बेंगळुरू/मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat kohli strikes rs 100 crore deal with puma
विराटचा नवा विक्रम; 'पुमा'शी १०० कोटींचा करार


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या मैदानावरील यशासोबतच त्याची 'ब्रॅण्ड व्हॅल्यू'ही कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. क्रीडा साहित्य निर्मितीतील एक आघाडीची कंपनी असलेल्या 'पुमा' कंपनीशी विराटनं नुकताच ११० कोटी रुपयांचा करार केला आहे. एकाच कंपनीसोबत इतक्या मोठ्या रकमेचा करार करणारा विराट हा पहिला क्रीडापटू ठरला आहे.

'पुमा'नं विराटसोबत केलेला हा करार आठ वर्षांचा आहे. 'पुमा'ने याआधीही अनेक दिग्गज क्रीडापटूंसोबत करार केला आहे. यात उसेन बोल्टसह महान फुटबॉलपटू पेले, मॅरॅडोना यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. अशा खेळाडूंच्या यादीत माझंही नाव असणं हा मी बहुमान समजतो, असं विराटनं म्हटलं आहे. विराटनं या कराराबाबत अधिक माहिती देणं टाळलं आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, हा करार ११० कोटींच्या आसपास झाला आहे.

विविध एजन्सी व कंपन्यांसोबत करार करून १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश आहे. मात्र, एकाच कंपनीसोबत एवढ्या मोठ्या रकमेचा करार त्यांना करता आला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज