अ‍ॅपशहर

‘मुंबई’विरुद्ध विराट खेळणार?

खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतींना मुकणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीने पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 12 Apr 2017, 4:00 am
नवी दिल्ली : खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतींना मुकणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीने पुनरागमन करण्याची शक्यता आहे. ही लढत १४ एप्रिलला होणार आहे. कोहलीने जिममध्ये सराव करतानाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर टाकला आहे. यात तो वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत त्याचा खांदा दुखावला होता. त्यामुळे खांद्याची ताकद वाढविण्यासाठी तो वेटलिफ्टिंग करीत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat will play his first ipl game probably against mumbai indians
‘मुंबई’विरुद्ध विराट खेळणार?

कोहली म्हणतो, की मैदानात उतरण्यासाठी आता मी स्वत:ला रोखू शकत नाही. १४ एप्रिलला खेळू शकेन ???? त्याच्या या प्रश्नचिन्हांमुळे तो शंभर टक्के तंदुरुस्त असल्याची खात्री देत येत नाही. आयपीएल संपल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. त्यादृष्टीने कोहली आयपीएलमध्ये खेळण्याची घाई करणार नसल्याचेही समजते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज