अ‍ॅपशहर

विक्रमी विराट

भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या भलत्याच फॉर्मात आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकाविले होतेच, पण त्याच्या खेळातील लय दुसऱ्या कसोटीतही कायम आहे. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पाचवे द्विशतक झळकाविले आणि एकूण कसोटी शतकांची संख्या १९वर नेऊन ठेवली. या शतकाच्या निमित्ताने विराटने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

Maharashtra Times 27 Nov 2017, 12:28 am
नागपूर : भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या भलत्याच फॉर्मात आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकाविले होतेच, पण त्याच्या खेळातील लय दुसऱ्या कसोटीतही कायम आहे. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पाचवे द्विशतक झळकाविले आणि एकूण कसोटी शतकांची संख्या १९वर नेऊन ठेवली. या शतकाच्या निमित्ताने विराटने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virats recordbreaking innings
विक्रमी विराट


विराटने या वर्षात १० शतके झळकाविली आहेत. एकाच वर्षात एवढी शतके करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्यात वनडेत ६ शतके असून कसोटीत त्याच्या नावे ४ शतके आहेत.

रिकी पॉन्टिंगने २००५ व २००६मध्ये दोन्ही क्रिकेट प्रकारात ९ शतके ठोकली होती. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या खात्यावरही अशीच ९ शतके जमा आहेत. त्यांना विराटने मागे टाकले आहे.

भारतीय कर्णधार म्हणून विराट हा सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू ठरला आहे. याआधी, माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या नावावर ११ शतके होती. विराटने १२ शतके केली आहेत.

विराटचे हे पाचवे कसोटी द्विशतक आहे. राहुल द्रविडशी त्याने आता बरोबरी केली असून सचिन तेंडुलकर आणि वीरेंदर सेहवाग हे त्याच्यापेक्षा एका शतकाने पुढे आहेत.

विराटने केलेली ही द्विशतके पाच वेगवेगळ्या देशांविरुद्धच्या मालिकांत साजरी केली आहेत. वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश व श्रीलंकेविरुद्ध त्याने ही द्विशतके केली.

कसोटी क्रिकेटमध्ये ५००० धावा करण्यासाठी विराटला आणखी २५ धावा हव्या आहेत.

आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून किमान दहा शतकांची तुलना केली तर विराटचा शतके पूर्ण करण्याचा वेग हा सर डॉन ब्रॅडमन आणि मायकेल क्लार्क यांच्यापेक्षाही सरस आहे. ३१ कसोटीत कोहलीने कर्णधारपद भूषवताना १६वेळा ५० धावा केल्या आणि त्यात १२वेळा त्याने शतके पूर्ण केली. हा वेग ७५ टक्के आहे. ब्रॅडमन आणि क्लार्कहा हा वेग ६६.६६ टक्के आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज