अ‍ॅपशहर

सचिन तेंडुलकर सच्चा खेळाडू: अक्रम

रिव्हर्स स्विंगचा बादशहा आणि पाकिस्तानचा माजी तेजतर्रार गोलंदाज वसीम अक्रमने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सचिन हा क्रिकेट विश्वातील खराखुरा नायक आहे. तो एक महान आणि सच्चा खेळाडू आहे, असे तो म्हणाला.

Maharashtra Times 13 Nov 2017, 11:22 am
मटा ऑनलाइन वृत्त । शारजा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wasim akram praise tendulkar as true master of the game
सचिन तेंडुलकर सच्चा खेळाडू: अक्रम


रिव्हर्स स्विंगचा बादशहा आणि पाकिस्तानचा माजी तेजतर्रार गोलंदाज वसीम अक्रमने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सचिन हा क्रिकेट विश्वातील खराखुरा नायक आहे. तो एक महान आणि सच्चा खेळाडू आहे, असे तो म्हणाला.

वसीम अक्रम शारजामधील एका पुस्तक मेळाव्याला आला होता. यावेळी त्याने सचिनची स्तुती केली. सचिन तेंडुलकर माणूस म्हणून महान आहेच, याशिवाय तो एक सच्चा खेळाडू आहे. क्रिकेटमधील प्रदीर्घ कारकिर्दीत तो कोणत्याही वादात सापडला नाही. मैदानात असो की मैदानाबाहेर, त्याने नेहमीच क्रिकेटला जिंकून दिले आहे. सचिनच्या रूपात जगातील सर्वात महान क्रिकेटरला जवळून पाहिले आहे, असे तो म्हणाला.

सचिनला पहिल्यांदा पाहिले त्यावेळीच त्याच्यात काहीतरी विशेष आहे हे जाणवले. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले. त्याच्या खेळाचे तंत्र पाहून हैराण झालो होतो. हनुवटीवर चेंडू लागल्यानंतरही त्याने जी लढाऊवृत्ती दाखवली ते पाहून चकित झालो, अशी आठवणही त्याने सांगितली.

यावेळी त्याने भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांचीही स्तुती केली. मी अनेक फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. पण गावस्कर यांना बाद केले, तो क्षण माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च होता. आताच्या खेळाडूंनी त्यांच्याकडून फलंदाजीचे तंत्र शिकून घ्यावे, असेही तो म्हणाला. यावेळी त्याने कर्णधार विराट कोहलीचेही कौतुक केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमी सामन्यांमध्ये ३२ शतके केली. सध्याच्या 'मॉडर्न' क्रिकेटमधील तो सर्वात महान खेळाडू आहे. त्याची बहुतांश शतके ही दुसऱ्या डावातील आहेत. यावरून तो महान खेळाडू आहे हे सिद्ध होते, असेही अक्रम म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज