अ‍ॅपशहर

‘कौशल्यांच्या आधारे भारतीय संघाला हरवू’

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये कौशल्यांच्या आधारे भारताला हरवू, असे मत ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने व्यक्त केले आहे.

Maharashtra Times 13 Mar 2017, 3:12 am
रांची : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये कौशल्यांच्या आधारे भारताला हरवू, असे मत ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम we have got to beat india on skill says australia wicketkeeper matthew wade
‘कौशल्यांच्या आधारे भारतीय संघाला हरवू’


भारतीय संघाविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. मालिकेतील पहिला सामना हरल्यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करून दुसऱ्या सामन्यातील विजयासह मालिकेत बरोबरी केली. आता त्यांना आणखी विजय मिळवू न देणे हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी आम्हाला दर्जेदार क्रिकेट खेळावे लागेल. ऑस्ट्रेलिया संघांतील खेळाडूंनी त्यांच्या कौशल्यांचा योग्य वापर केल्यास आम्ही भारताला हरवू शकतो, असे वेड म्हणाला. महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वेगळे असल्याचेही मत वेडने यावेळी व्यक्त केले. मागील काही वर्षांमध्ये भारतीय संघ आक्रमक क्रिकेट खेळत असला, तरी धोनीच्या नेतृत्वाखालील संघाची आक्रमकता वेगळ्या प्रकारची होती व विराटच्या नेतृत्वाखालील संघाची आक्रमकता वेगळी आहे, असे वेडने नमूद केले. उर्वरित सामन्यांत वैयक्तिक कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही वेडने या वेळी सांगितले.

कोहली वैफल्यग्रस्त : जॉन्सन

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे धावा करता न आल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली वैफल्यग्रस्त झाला असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सनने व्यक्त केले. या निराशेमुळेच कोहलीला मैदानावर आपल्या भावनांवर ताबा ठेवता येत नसल्याचेही जॉन्सन म्हणाला. बेंगळुरू येथील दुसऱ्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्हन स्मिथ व कोहली यांच्यामध्ये मैदानावर रंगलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जॉन्सनने हे मत व्यक्त केले आहे. बेंगळुरू सामन्यामध्ये प्रत्येकवेळी ऑस्ट्रेलियाची विकेट गेल्यानंतर टीव्ही कॅमेरे विराटची मैदानावरील प्रतिक्रिया टिपत होते. कारण, विराट आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त करत होता. क्वचितप्रसंगी असे करणे समजू शकते, मात्र मैदानावर खेळाडूंनी भावना व्यक्त करताना संयम बाळगायला हवा, असेही जॉन्सन म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज