राजस्थानचा अष्टपैलू बेन स्टोक्सने सँटनरला टाकेला चेंडू पंज उल्हास गंधे यांनी नोबॉल ठरवला. मात्र स्क्वेअरलेगला पंचगिरी करणाऱ्या ब्रुस ऑक्झेनफर्ड यांनी हा निर्णय गंधे यांना बदलण्यास सांगितला. या गंधे यांनाच धोनीच्या रागाचा सामना करावा लागला. त्यांच्याकडे धोनी हातवारे करून त्रागा करत होता. पंच ऑक्झेनफर्ड हे धोनीची समजूत काढत होते.
काय आहे शिक्षा...
आयपीएलच्या नियमानुसार पंचांच्या निर्णायवर शाब्दिक किंवा कृतीतून टीका केल्यास संबंधित खेळाडूला जास्तीत जास्त एक कसोटी किंवा दोन वनडेंच्या बंदीची शिक्षा होऊ शकते.