अ‍ॅपशहर

हॅटट्रिक बॉलआधी धोनी कुलदीपला म्हणाला...

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाविरोधात हॅटट्रिक घेतल्यानं टीम इंडियाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवचा आनंद गगनात मावत नाहीए. ही कामगिरी आपल्यासाठी खूपच खास असल्याचं तो सांगतो, पण त्याचवेळी या यशाचं श्रेय महेंद्रसिंह धोनीलाही देतो.

Maharashtra Times 22 Sep 2017, 2:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम what ms dhoni told kuldeep yadav before the hat trick ball
हॅटट्रिक बॉलआधी धोनी कुलदीपला म्हणाला...

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाविरोधात हॅटट्रिक घेतल्यानं टीम इंडियाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवचा आनंद गगनात मावत नाहीए. ही कामगिरी आपल्यासाठी खूपच खास असल्याचं तो सांगतो, पण त्याचवेळी या यशाचं श्रेय महेंद्रसिंह धोनीलाही देतो.

टीम इंडियाच्या २५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ३०व्या षटकांत १३८ धावांवर ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मॅथ्यू वेड, अॅश्टन एगर यांच्यावर त्यांची भिस्त होती. परंतु, कुलदीपच्या फिरकीनं कमाल केली. ३३व्या ओव्हरमध्ये त्यानं या दोघांनाही लागोपाठच्या चेंडूवर माघारी धाडलं. आता तो हॅटट्रिकची किमया करतो का, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती.

माझ्याही मनात त्या क्षणी धाकधुक होती. कसा चेंडू टाकावा, याबद्दल संभ्रम होता. म्हणून मी आधी धोनीकडे जाऊन त्याचा सल्ला घेतला. मी कशाप्रकारे चेंडू टाकावा, असं त्याला विचारलं तेव्हा त्याने माझं मनोबल वाढवलं. 'तुला जे योग्य वाटतंय, तसाच चेंडू टाक', या त्याच्या वाक्याने माझा आत्मविश्वास उंचावला आणि संधीचं सोनं झालं, अशा भावना कुलदीपनं व्यक्त केल्या.

ईडन गार्डन्सवर हॅटट्रिक घेण्याची किमया भारतातर्फे आत्तापर्यंत केवळ कपिल देवनं (१९९१) केली होती. आता कुलदीपनंही तसाच पराक्रम करून दाखवलाय.

२०१४ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत कुलदीपनं स्कॉटलंड संघाविरोधात हॅटट्रिक घेतली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज