अ‍ॅपशहर

... आणि केदार मांसाहारी झाला

छोट्या चणीच्या केदार जाधवने इंग्लंडविरुद्धच्या पुणे वनडेमध्ये केलेल्या ६५ चेंडूंमधील शतकानंतर त्याला ‘छोटा पॅकेट बडा धमाका’, असे म्हटले जाते आहे. मात्र षटकार, चौकार खेचणारा हा फलंदाज शाकाहारी होता, असे सांगितले तर आश्चर्य वाटते. बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी सदस्य सुरेंद्र भावे यांनी याबद्दल किस्सा सांगितला.

Maharashtra Times 19 Jan 2017, 2:19 am
कटकः छोट्या चणीच्या केदार जाधवने इंग्लंडविरुद्धच्या पुणे वनडेमध्ये केलेल्या ६५ चेंडूंमधील शतकानंतर त्याला ‘छोटा पॅकेट बडा धमाका’, असे म्हटले जाते आहे. मात्र षटकार, चौकार खेचणारा हा फलंदाज शाकाहारी होता, असे सांगितले तर आश्चर्य वाटते. बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी सदस्य सुरेंद्र भावे यांनी याबद्दल किस्सा सांगितला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम when kedar jadhav became non vegetarian
... आणि केदार मांसाहारी झाला


केदारचे वडील महादेव जाधव हे महावितरणाच्या सेवेत आहेत. हे संपूर्ण कुटुंबच शाकाहारी आहे. मात्र चोख फिटनेस आणि फटक्यांमध्ये ताकद येण्यासाठी मासांहार घ्यावा लागेल, अशी सूचना महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू भावे यांनीच केदारला केली. ‘तुम्हाला याचे श्रेय मला द्यावे लागेल; कारण मीच त्याला चिकन खाण्याचा सल्ला दिला होता. केदारला आता जे यश व लोकप्रियता लाभली आहे, त्यात माझे श्रेय नाही; पण मी प्रशिक्षक, मोठा भाऊ, मार्गदर्शक या नात्याने त्याला सल्ला दिला आहे. २०१०-११मध्ये मी त्याला काही बदल सूचवले होते, जे त्याने पटकन आत्मसात केले. तो सर्व प्रकारचे क्रिकेट खेळू शकतो’, असे भावे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज