अ‍ॅपशहर

मेस्सीने खरा धक्का तर वर्ल्डकप जिंकल्यानंतर दिला; विजेतेपद मिळवल्यानंतर दिली मोठी बातमी

Lionel Messi: कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद मिळवले. या विजयानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने एक मोठी घोषणा केली.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2022, 12:56 pm
नवी दिल्ली: जगातिक फुटबॉल विश्वातील सर्वात मोठा स्टार आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीने अखेर ३६ वर्षानंतर देशवासियांचे स्वप्न साकारले. करातमध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शुट आऊटमध्ये पराभव केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lionel messi


अर्जेंटिनाने जेव्हा अंतिम फेरीत प्रवेश केला होता तेव्हापासून अशी चर्चा सुरू झाली की, मेस्सीचा हा अखेरचा वर्ल्डकप असेल आणि मॅच झाल्यानंतर तो निवृत्ती घेईल. स्वत: मेस्सीने देखील तसे संकेत दिले होते. अशाच अंतिम फेरीत जेव्हा अर्जेंटिनाने विजय मिळवला तेव्हा तर सर्वांची खात्रीच झाली की मेस्सी आता निवृत्ती जाहीर करेल.

वाचा- अर्जेंटिनाच्या विजयानंतर देहभान विसरली मेस्सीची चाहती; टॉपलेस होऊन केला जल्लोष,Watch Video

देशाला तिसरे वर्ल्डकप विजेतपद मिळवून देणाऱ्या मेस्सीने अंतिम सामन्यात पेनल्टी शुट आऊटमधील गोलसह एकूण ३ गोल केले. फायनलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या मेस्सीने खरा धक्का मॅच झाल्यानंतर केला. एका बाजूला मेस्सीने वर्ल्डकप जिंकला पण दुसऱ्या बाजूला तो निवृत्ती घेणार अशी भीती चाहत्यांच्या मनात असताना मेस्सीने एक मोठी आनंदाची बातमी दिली.

वाचा- तेव्हाच ठरलं की फ्रान्सचा पराभव होणार; उगाच नव्हता मेस्सी निश्चिंत, फिफा फायनलमधील...

एका वेबसाइटशी बोलताना मेस्सी म्हणाला, मी निवृत्ती अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेणार नाही. मला चॅम्पियन म्हणून खेळायचे आहे. मेस्सीच्या या वाक्याने जगभरातील त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाचा- अर्जेंटिना वर्ल्डकप जिंकणार, मेस्सी महान होणार हे ७ वर्षापूर्वी ठरलं होतं; २०१५ सालचं ट्विट..

अंतिम लढत अतिरिक्त वेळेत ३-३ अशी बरोबरीत राहिल्याने अर्जेंटिनाने पेनल्टी शुटमध्ये ४-२ असा विजय मिळवला. मेस्सीला गोल्डन बॉलचा पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत मेस्सीने ७ गोल केले आणि ३ गोल करण्यासाठी मदत केली.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख