मॉस्को :
यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपमधील पहिला धक्कादायक निकाल लागला आहे. जगज्जेत्या जर्मनीला साखळीतील सलामीच्या लढतीतच मेक्सिकोने पराभवाची धूळ चारली आहे. मॉस्कोतील लुझ्निकी स्टेडियमवर रंगलेल्या लढतीत मेक्सिकोने जर्मनीचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला.
जगज्जेता जर्मनी संघ जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असून क्रमवारीत १५व्या स्थानी असलेल्या मेक्सिकोकडून त्यांना पराभव पत्करावा लागल्याने जर्मनीचा यंदाच्या वर्ल्डकपमधील प्रवास खडतर असणार, हे स्पष्ट झाले आहे.
जर्मनी वि. मेक्सिको
१ जागतिक क्रमवारी १५
१२ आमनेसामने १२
५ विजय २
२ पराभव ५
५ बरोबरी ५
२४ गोल ११
१८ वर्ल्ड कपमध्ये सहभाग १५