मुंबई : राज्य कबड्डी संघटनेच्या घटनेत बदल करण्यावरून मागे निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता घटनेच्या नव्या मसुद्याला असोसिएशनच्या आज होत असलेल्या पुण्यातील विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात येण्याची शक्यता आहे. या घटनेत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. पूर्वीच्या घटनेतील कार्यकारिणी सदस्यांची संख्याही बदलली जाईल. तसेच शासकीय समिती यापुढे वगळण्यात येणार आहे. त्याशिवाय, निवड समितीतही आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक यांचा समावेश असेल. तूर्तास मात्र राष्ट्रीय क्रीडा धोरणानुसार ही घटना तयार केली जाणार नाही.
आज राज्य कबड्डीच्या घटनेला मंजुरी
राज्य कबड्डी संघटनेच्या घटनेत बदल करण्यावरून मागे निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता घटनेच्या नव्या मसुद्याला असोसिएशनच्या आज होत असलेल्या ...
Maharashtra Times 19 Aug 2018, 4:00 am