मुंबई : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.आणि रायगड जिल्हा कबड्डी असो. यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ६६व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. रायगड-रोहा येथील म्हाडा कॉलनीच्या मैदानावर मॅटच्या चार क्रीडांगणावर हे सामने खेळविण्यात येतील. महाराष्ट्राला विजेतेपद राखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. या स्पर्धेत महासंघाला संलग्न असलेले २८राज्याचे संघ व सेनादल, भारतीय रेल्वे, बीएसएनएल हे व्यावसायिक युनिट असे ३१संघ सहभागी होणार आहेत. या संघाची आठ गटात विभागणी करण्यात येणार असून सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन होईल.
आजपासून रोह्यात राष्ट्रीय कबड्डी
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोआणि रायगड जिल्हा कबड्डी असो...
30 28 Jan 2019, 4:00 am