वृत्तसंस्था, पाटणा
पुणेरी पलटनने बुधवारी अष्टपैलू खेळामुळे प्रो कबड्डी लीगमध्ये दबंग दिल्लीवर ३१-२७ असा विजय मिळवला. पाटण्याच्या पाटलीपूत्र बंदीस्त स्टेडियममध्ये पार पडलेल्या या लढतीत पुणेरी पलटणकडून चढाया आणि बचाव अशा दोनही बाजूंमध्ये सरस खेळ झाला. जीबी मोरेने सर्वाधिक पाच गुणांची कमाई केली, तर दीपक दाहिया, संदीप नरवाल आणि रिंकू नरवाल यांनी प्रत्येकी चार गुण पटकावले.
पुण्याचा कर्णधार गिरीश इर्नाकने दोन पकडी केल्या, त्या यशस्वी ठरल्या. तसेच अक्षय जाधवने अष्टपैलू कामगिरी करत चढाई व पकडीमध्ये प्रत्येकी एक गुण पटकावला. दिल्लीकडे राजेश नरवाल, विशाल माने, रवींदर पहल आणि मीराज शेखसारखे अनुभवी शिलेदार आहेत, तरीदेखील दिल्लीची डाळ शिजली नाही.
अंतिम निकालः पुणेरी पलटण ३१ विजयी वि. दबंग दिल्ली २७.
पुणेरी पलटणः जीबी मोरे ५, दीपक दाहिया ४, संदीप नरवाल ४, रिंकू नरवाल ४, मोनू ३, गिरिश इर्नाक २, अक्षय जाधव २.
दबंग दिल्लीः नवीनकुमार ७, जोगिंदर नरवाल ४, चंद्रन रणजीत ३, रवींदर पहल २, मीराज शेख २.
पाटण्याचा सलग चौथा पराभव
प्रो कबड्डी लीगमधील ताकदीचा संघ अशी ख्याती असलेल्या पाटणा पायरेट्सला आपल्या घरच्या मैदानावर अद्याप एकही लढत जिंकता आलेली नाही. बुधवारी त्यांच्यावर बेंगळुरू बुल्सने ४३-४१ असा निसटता विजय मिळवला. यंदाच्या मोसमातील पाटण्याचा हा घरच्या मैदानावरील सलग चौथा पराभव ठरला आहे.