अ‍ॅपशहर

नीरज चोप्राचा भन्नाट डान्स; 'गोल्डन बॉय'चा व्हिडिओ तुफान व्हायरल...

नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत सर्वांनाच आपले वेड लावले आहे, पण आता नीरजचा एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कारण चाहत्यांनी नीरजच्या डान्सचा हा व्हिडीओ आता डोक्यावर घेतला आहे...

Lipi 12 Aug 2021, 10:13 am
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा आता सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. एकीकडे लोक नीरजच्या खेळाचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियात त्याच्या डॅशिंग लूक आणि परफेक्ट बॉडीचं अनेकांना वेड लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नीरजचे जुने फोटो, व्हिडिओ शोधून काढले जात आहेत. आताही नीरजचा असाच एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रांगडा डान्स करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या या नृत्य कौशल्याचंही कौतुक केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम golden boy neeraj chopra old dance on daler mehndi song video viral
नीरज चोप्राचा भन्नाट डान्स; 'गोल्डन बॉय'चा व्हिडिओ तुफान व्हायरल...


मैदानात खेळाबाबत सतर्क आणि गंभीर असणारा नीरज वैयक्तिक आयुष्यात मात्र एकदम बिनधास्त आणि मस्त जीवन जगणारा माणूस आहे. अनेकांनी त्याला 'मोस्ट एलिजेबल बॅचलर' म्हटले आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक दिलेर मेहंदी यांच्या 'सतरंगी' आणि आणखी एका हरियाणी गाण्यावर नीरज तुफान डान्स करताना पाहायला मिळत आहे.

मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये तो आपल्या मित्रांसोबत डीजेवर नाचताना दिसत आहे. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातली आहे. पायात स्पोर्ट्स शूज घातले आहेत. आणि मित्रांसोबत तो भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्याला नाचताना पाहून अनेक नेटकरी त्याच्या डान्सचेही चाहते झाले आहेत. सामान्य नागरिकांप्रमाणे तोदेखील मनोरंजनासाठी नाचत आहे.

याआधीही त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. क्रिकेट प्रेझेंटर जतीन सप्रूने त्याला 'तू कुणाची हेअरस्टाईल कॉपी करतो,' असे विचारले होते. त्यावेळी त्याने 'ही माझीच हेअरस्टाइल असून मी कुणाला कॉपी करत नाही,' असे उत्तर दिले होते. सुवर्णपदक जिंकून मायदेशी आलेल्या नीरजचे जंगी स्वागत करण्यात आले. 'हे सुवर्णपदक माझं नसून संपूर्ण देशाचं आहे. तुम्ही तुमचे शंभर टक्के द्या, कोणाला घाबरू नका. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल,' असे तो यावेळी म्हणाला होता. सुवर्णपदक पटकावल्यावरही नीरजचं लक्ष अजूनही आपल्या खेळावरच आहे. त्यामुळे आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतील.

महत्वाचे लेख