टोकियो : भारताला आजच्या दिवशी एक मोठी सुवर्णपदकाची संधी चालून आली आहे. भारताच्या फौदा मिर्झाने घोडेस्वारी या खेळात नेत्रदीपक कामगिरी केली आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखआत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता या अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी केल्यावर मिर्झा सुवर्णपदकाला गवसणी घालू शकतो.
भारताला सुवर्णपदकाची अजून एक संधी, फौद मिर्झा पोहोचला अंतिम फेरीत...
भारतासाठी आज एक आनंदाची बातमी आली आहे. कारण भारताचा फौद मिर्झा आता अंतिम फेरीत पोहोचला असून तो सुवर्णपदकाला गवसणी घालू शकतो. त्यामुळे आता अंतिम फेरीत फौदची कामगिरी कशई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Aug 2021, 4:10 pm