अ‍ॅपशहर

बॅडमिंटनमध्ये भारताच्या पदरी निराशा; मॅच जिंकली तरीही स्पर्धेतून बाहेर

Tokyo Olympics 2020 : भारताला शूटिंग आणि बॅडमिंटनमधून सर्वात जास्त पदकांची अपेक्षा होती, पण बरेच खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडल्याने भारताचा अपेक्षाभंग झाला आहे.

Lipi 27 Jul 2021, 11:56 am
टोकियो : एक असतं पराभूत होणं... एक असतं पराभूत होऊनही मनं जिकणं... पण टोकियो ऑलिम्पिकच्या बॅटमिंटन कोर्टवर दुहेरी गटात भारताच्या चिराग-सात्विक जोडीबरोबर जे झालं ते होतं जिंकूनही पराभूत होणं. ग्रेट ब्रिटनच्या जोडीविरुद्धचा सामना सहज जिंकला पण या विजयानंतरही त्यांना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवता आले नाही. कारण प्रत्येक गटातून फक्त दोन संघांनाच पुढे जाता येतं आणि भारत आपल्या ग्रुपमध्ये तैवान आणि इंडोनेशियानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian satwiksairaj rankireddy and chirag shetty fail to qualify for quarter final in tokyo olympic
बॅडमिंटनमध्ये भारताच्या पदरी निराशा; मॅच जिंकली तरीही स्पर्धेतून बाहेर


वाचा- एक विजय आणि भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळणार दुसरे पदक

चिराग-सात्विक जोडीने ग्रेट ब्रिटनच्या बेन लेन आणि सीन वेंडी या जोडीवर सहज विजय मिळवला. त्यांनी ब्रिटन जोडीचा 21-17 आणि 21-19 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुसरा सेट जिंकून सामना पुढे ढकलण्याचे ब्रिटीश जोडीचे सर्व प्रयत्न अपुरे पडले.

वाचा- रुपिंदरचा डबल धमाका, भारताचा स्पेनवर शानदार विजय

यामुळे झाले पराभूत

चिराग-सात्विक जोडीला सामना जिंकूनही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले नाही. असे का झाले? कारण भारत गटामध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला. गटामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या तैवान आणि इंडोनेशियाच्या तुलनेत भारताने कमी सामने जिंकले आहेत. उपांत्यपूर्व फेरीमध्ये जाण्यासाठी भारताला ग्रेट ब्रिटनविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे होते. तसेच दुसऱ्या सामन्यात इंडोनेशिया चीनी तैपेई जोडीविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे होते. भारताने आपल्या हातात असणारा सामना जिंकला, पण दुसरीकडे इंडोनेशियाने सामना गमावला. त्यामुळे भारताला उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळाले नाही.

वाचा- पराभवानंतर देशाची माफी मागितली, पंतप्रधान म्हणाले...

चिराग-सात्विक जोडीला जिंकूनही स्पर्धेत आपले आव्हान कायम राखता आले नाही. ही जोडी बाहेर पडल्याने आता पदकांची आशा पी.व्ही.सिंधूकडून असणार आहे. सिंधू महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज