अ‍ॅपशहर

Video : आरजे मलिष्कानं नीरज चोप्राकडे मागितली 'जादू की झप्पी'; गोल्डन बॉयनं नेमकं काय केलं पाहा...

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून नीरज चोप्रालं नशीबच पालटून गेलं आहे. पण आता तर आरजे मलिष्काने सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राकडे 'जादू की झप्पी' मागितीली होती, त्यावर नीरजने काय केलं, पाहा खास व्हिडीओ...

Lipi 20 Aug 2021, 9:23 pm
नवी दिल्ली :सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रसिद्ध रेडिओ जॉकी RJ मलिष्काने नीरजची एक मुलाखत घेतली आहे. यावेळी मलिष्का आणि तिच्या काही मैत्रिणींनी नीरजसाठी एका बॉलिवूड गाण्यावर डान्सही केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rj malishka asks olympic hero neeraj chopra for jaadu ki jhappi
Video : आरजे मलिष्कानं नीरज चोप्राकडे मागितली 'जादू की झप्पी'; गोल्डन बॉयनं नेमकं काय केलं पाहा...

मुलाखतीचा शेवट करण्याआधी मलिष्काने नीरजकडे 'जादू की झप्पी'ची मागणी केली. नीरजकडे ही मागणी करताच तो लाजला आणि म्हणाला, लांबूनच नमस्कार. भारताचा गोल्डन बॉय टोकियो ऑलिम्पिकहून परतल्यानंतर खूप व्यस्त झाला आहे. त्याला सतत माध्यम प्रतिनिधींनी वेढा टाकलेला असतो. टीव्ही, रेडिओ आणि वेगवेगळ्या माध्यमांसाठी तो मुलाखती देत आहे. ट्रॅक अँड फील्डमध्ये देशासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकून नीरजने इतिहास घडवला आहे.

या दरम्यान, तो 'रेड एफएम' या रेडिओ चॅनेलच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाला होता. आरजे मलिष्का आणि तिच्या मैत्रिणींनी नीरजसाठी 'उडे जब जब जुल्फे तेरी' या गाण्यावर डान्स केला आणि त्यानंतर मलिष्काने त्याची मुलाखत घेतली. मलिष्का म्हणाली, जाण्याआधी मला एक जादूची मिठी (जादू की झप्पी) पाहिजे आहे. त्यावर नीरज म्हणाला, धन्यवाद, दूरूनच नमस्कार, असं दुरूनच भेटा. आणि तो पुन्हा हसायला लागला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजने भारतासाठी नवा इतिहास रचला आहे. सुवर्णपदक जिंकून मायदेशी आल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. विविध राज्य सरकारांनी त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. अनेक कंपन्यांनी त्याला आयुष्यभर मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज