अ‍ॅपशहर

भारताने दोन पदकं मिळवलेले क्रीडा प्रकार पुढच्या ऑलिम्पिकमधून होणार आउट, चाहत्यांना मोठा धक्का

भारताने ज्या खेळांमध्ये दोन पदकं पटकावली होती, ते क्रीडा प्रकार आता पुढच्या पॅरीसमधील ऑलिम्पिकमधून हटवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे भारताच्या चाहत्यांना आता मोठा धक्का बसू शकतो. कारण हे दोन खेळ वगळले तर खेळाडूंचे काय होणार, याचा विचार चाहते करत आहेत.

Lipi 9 Aug 2021, 8:42 am
Tokyo Olympics 2020 : टोकियो : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (IOC) ऑलिम्पिक स्पर्धेतून एखादा खेळ काढून टाकण्यासाठीचे अधिक अधिकार देण्यात आले आहेत. ज्या खेळांमध्ये नियमांचे अधिक उल्लंघन होईल, असे क्रीडा प्रकार 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमधून काढून टाकले जाऊ शकतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shocking to indian fans ioc gets more power to remove sports from 2024 paris olympics
भारताने दोन पदकं मिळवलेले क्रीडा प्रकार पुढच्या ऑलिम्पिकमधून होणार आउट, चाहत्यांना मोठा धक्का


मतदानाद्वारे IOC ला मिळाले अधिकार
वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगची प्रशासन व्यवस्था बऱ्याच काळापासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. डोपिंग वेटलिफ्टिंगशी देखील संबंधित आहे. त्यामुळे हा खेळ पॅरिस ऑलिम्पिकमधून वगळण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. या दोन खेळांशी संबंधित मुद्दे पाहता, आयओसीच्या सदस्यांनी ऑलिम्पिक कार्यक्रमातून कोणताही खेळ वगळण्यासाठी क्रीडा संस्थेला अधिक अधिकार देण्यासाठी मतदान केले. त्यानुसार हे अधिकार क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेला मिळाले आहेत.

नियम मोडल्यास होणार कारवाई
यापुढे एखाद्या खेळामध्ये आयओसीच्या कार्यकारी मंडळाच्या निर्णयांचे पालन केले नाही, किंवा ऑलिम्पिकची प्रतीमा डागाळली जाईल, अशा गोष्टी करत असेल, तर आयओसी तो खेळ ऑलिम्पिक कार्यक्रमातून काढून टाकू शकते.

पॅरिस ऑलिम्पिकमधून हटणार वेटलिफ्टिंग?
अनेक वर्षांपासून डोपिंग समस्या आणि संचालनाशी संबंधित इतर कारणांमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून वेटलिफ्टिंग वगळले जाऊ शकते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनच्या नियंत्रणातून काढून टाकण्यात आली.

भारताला वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगमध्येही मिळालंय पदक
भारताच्या मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे. जर 2024च्या ऑलिम्पिकमधून बॉक्सिंग हटविण्याचा निर्णय घेतला, तर मीराबाईचं पदकाचा रंग बदलण्याचं स्वप्न अपूर्ण राहू शकतं. दुसरीकडे बॉक्सिंगमध्येही भारताच्या लव्हलिनाने कांस्य पदक पटकावलं आहे. त्यामुळे मीराबाई, लव्हलिनासह खेळांकडे वळणाऱ्या नव्या खेळाडूंचाही यामुळे हिरमोड होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज