अ‍ॅपशहर

कुस्तीमधून आणखी एक आनंदाची बातमी; बजरंग पुनिया उपांत्य फेरीत दाखल

Bajrang Punia in Semifinal: टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताला आणखी एक पदक मिळण्याची शक्यता आहे. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Aug 2021, 11:03 am
टोकियो: ऑलिम्पिक २०२० मध्ये गुरुवारी भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कुस्तीमध्ये भारताच्या बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात सलग दोन विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सुवर्णपदकासाठी बजरंगला दोन विजयांची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम बजरंग पुनिया


गुरुवार ६ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशाचे लक्ष्य महिला हॉकी संघाच्या कांस्यपदकाच्या लढतीवर होते. महिला संघाला ग्रेट ब्रिटनकडून पराभव झाला. पण कुस्तीमध्ये बजरंगने निराश केले नाही. पहिल्या लढतीत त्याने कझाकिस्तानचा एर्नाझर अकमातालिवचा पराभव केला. त्यानंतर इराणच्या गियाजी मुर्तजावर शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

वाचा- महिला हॉकी संघाचे स्वप्नभंग; कांस्यपदक लढतीत ग्रेट ब्रिटनकडून पराभव

त्याआधी महिलाच्या ५० किलो लढतीत भारताच्या सीमा बिस्लाचा ट्युनिशियाच्या सारा हामदीने पराभव केला.

काल कुस्तीमध्ये भारताच्या रवीकुमार दहियाने रौप्यपदक जिंकले होते. भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील ते पाचवे पदक ठरले. काल झालेल्या दुसऱ्या एका लढतीत दीपक पुनियाचा निसटता पराभव झाला. त्याला कांस्यपदक जिंकण्याची संधी होती.

वाचा- मेस्सीचा बार्सिलोनाला रामराम, या कारणामुळे सोडला क्लब

आज बजरंगला इतिहास घडवण्याची संधी आहे. त्याने अंतिम फेरीत प्रवेश करून सुवर्णपदक जिंकल्यास अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरले. त्याच बरोबर वैयक्तीक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल.



ऑलिम्पिकमधील कुस्तीतील भारताची पदके

खाशाबा जाधव, कांस्य पदक- १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक

सुशीलकुमार,कांस्य पदक- २००८ बिजिंग ऑलिम्पिक

सुशीलकुमार,रौप्य पदक- २०१२ लंडन ऑलिम्पिक

योगेश्वर दत्त, कांस्य पदक-२०१२ लंडन ऑलिम्पिक

साक्षी मलिक, कांस्य पदक- २०१६ रिओ ऑलिम्पिक

रवीकुमार दहिया, रौप्यपदक २०२० टोकियो ऑलिम्पिक

महत्वाचे लेख