अ‍ॅपशहर

बजरंगनं पदकानंतर आता मनंही जिंकलं, घरी गेल्यावर 'या' व्यक्तीच्या गळ्यात घातलं पहिल्यांदा मेडल

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये देशाला पदक जिंकवून दिलं. त्यानंतर बजरंग भारतामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पण बजरंग जेव्हा घरी गेला तेव्हा त्याने एक अशी कृती केली की, सर्वांचं मनंच त्याने जिंकलं.

Lipi 11 Aug 2021, 9:06 pm
झज्जर, सोनिपत : टोकियो ऑलिम्पिकचा सांगता सोहळा पार पडल्यानंतर उर्वरीत खेळाडूसह भारतीय पथक मायदेशी परतले. सांगता सोहळ्यावेळी भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावणाऱ्या कुस्तीपटू बजरंग पुनियाचाही या पथकामध्ये समावेश होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या बजरंग पुनियाचे मंगळवारी त्याच्या गावी जंगी स्वागत करण्यात आले. आपल्या घरी पोहोचल्यानंतर बजरंगने केलेली कृती अनेकांच्या हृदयात घर करून गेली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tokyo olympics indian wrestler bajrang punia garlands bronze medal on his mother after reaching home
बजरंगनं पदकानंतर आता मनंही जिंकलं, घरी गेल्यावर 'या' व्यक्तीच्या गळ्यात घातलं पहिल्यांदा मेडल


घरी पोहोचल्यानंतर बजरंगने आपल्या आईच्या गळ्यात त्यानं जिंकलेलं कांस्य पदक घातलं. यावेळी त्याची पत्नी संगीता आणि वहिनींनी त्याचा आवडता पदार्थ चुरमा खायला देऊन त्याचं घरी स्वागत केलं.

यानंतर पत्रकारांशी बोलताना बजरंग म्हणाला की, पायाच्या दुखापतीमुळे मी कांस्य पदकावर समाधान मानत आहे. देशाला माझ्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. आता मी भविष्यात आणखी मेहनत करेन. दरम्यान, कांस्य पदकाच्या लढतीआधी बजरंगच्या आईने त्याच्या विजयासाठी शिवरात्रीचे व्रत केलं होतं. आपला मुलगा देशासाठी नक्कीच पदक आणेल, असा विश्वास बजरंगच्या वडिलांनाही होता.

बजरंगने गेल्या दहा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलं आहे. लेग डिफेन्स ही त्याची कमकुवत बाजू राहिली, पण त्याने त्यावर खूप मेहनत घेतली. त्यासाठी त्याला परदेशी प्रशिक्षकांची खूप मदत झाली.

बजरंगनं पूर्ण केली झज्जरची पदकाची आशा
झज्जरमधील बजरंगसह एकूण पाच खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये मनू भाकर, सुमीत नागल, दीपक पुनिया आणि राहुल रोहिल्ला यांचा समावेश आहे. या चौघांना पदक जिंकण्यात अपयश आले, पण बजरंगनं झज्जरमधील नागरिकांची पदक जिंकण्याची इच्छा पूर्ण केली.

महत्वाचे लेख