अ‍ॅपशहर

सलमान बनला ऑलिम्पिक चमूचा अॅम्बेसेडर

अभिनेता सलमान खान यावर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय चमूचा 'गुडविल अॅम्बेसेडर' असणार आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने आज याबाबत घोषणा केली. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एखाद्या बॉलिवूड स्टारला ऑलिम्पिक चमूचा अॅम्बेसेडर नेमण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Maharashtra Times 23 Apr 2016, 6:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम actor salman khan to be the goodwill ambassador for indian contingent at rio olympics
सलमान बनला ऑलिम्पिक चमूचा अॅम्बेसेडर

अभिनेता सलमान खान यावर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय चमूचा 'गुडविल अॅम्बेसेडर' असणार आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने आज याबाबत घोषणा केली. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एखाद्या बॉलिवूड स्टारला ऑलिम्पिक चमूचा अॅम्बेसेडर नेमण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सलमानने हा सन्मान मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतात सर्व प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. खेळांमध्ये सनिया मिर्झा, विजेंदर सिंह आणि सुशील कुमार हे माझे हिरो आहेत, असेही सलमान म्हणाला. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिच्याबाबत विचारले असता तिने आपल्या हिंमतीवर हे यश संपादन केलं आहे, अशा शब्दांत सलमानने तिचं कौतुक केलं.

खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्यास त्यांची कामगिरी आणखी उंचावण्यास मदत होईल, असेही सलमान पुढे म्हणाला. भारतीय हॉकी टीमचा कर्णधार सरदार सिंह, महिला हॉकी संघाची कर्णधार रितू राणी, मेरी कोम, दीपिका कुमारी, अपूर्वी चंदिला यावेळी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज