अ‍ॅपशहर

आदिल खानचे पुनरागमन

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील एफसी पुणे सिटी संघाने आदिल खान याला पुढील दोन मोसमासाठी आपल्याकडेच कायम राखण्याची घोषणा केली...

Maharashtra Times 26 Jun 2018, 4:00 am

पुणे सिटी संघात

आदिलचे पुनरागमन

पुणे : इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील एफसी पुणे सिटी संघाने आदिल खान याला पुढील दोन मोसमासाठी आपल्याकडेच कायम राखण्याची घोषणा केली. मागील मोसमामध्ये आदिलने चमकदार कामगिरी केली. एफसी पुणे सिटी संघ गेल्या मोसमात पहिल्या चारमध्ये होता. यात आदिलचा मोठा वाटा होता. गेल्या मोसमात त्याने १८ सामन्यांमध्ये ४ गोल नोंदवले. आदिल म्हणाला, 'पुन्हा एकदा एफसी पुणे सिटी संघात सामील होताना मला अतिशय आनंद होत आहे. एफसी पुणे सिटी संघाने माझे व्यावसायिक करियर परिपूर्ण केले आहे. एक संघ म्हणून गेल्या मोसमात संघाने प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. या मोसमात करंडक जिंकण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. मी एफसी पुणे सिटी संघाकडून खेळण्यास उत्सुक आहे आणि ऑरेंज आरमीला साजरे करण्यासाठी अनेक चांगले क्षण आम्ही देऊ.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज