अ‍ॅपशहर

माफीनाम्यानंतर फोगट बहिणींना प्रवेश

बेशिस्त वागणुकीमुळे महिला कुस्तीतील आघाडीच्या फोगट बहिणी आणि ११ मल्लांना राष्ट्रीय शिबिरातून वगळण्यात आले होते; पण माफीनाम्यानंतर गीता, रितू आणि संगीता यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) सुरू असलेल्या सरावात प्रवेश देण्यात आला आहे.

Maharashtra Times 26 May 2018, 1:08 am

नवी दिल्लीः

बेशिस्त वागणुकीमुळे महिला कुस्तीतील आघाडीच्या फोगट बहिणी आणि ११ मल्लांना राष्ट्रीय शिबिरातून वगळण्यात आले होते; पण माफीनाम्यानंतर गीता, रितू आणि संगीता यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) सुरू असलेल्या सरावात प्रवेश देण्यात आला आहे. मात्र फोगट बहिणींपैकी बबिताने अद्याप माफी मागितलेली नाही, त्यामुळे तिच्यावरील बंदी भारतीय कुस्ती फेडरेशनने कायम ठेवली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम fogat-sisters

कोणतेही कारण न देता शिबिरात उपस्थित न राहिल्याने भारतीय कुस्ती फेडरेशनने फोगट बहिणींसह ११ मल्लांना शिबिरातून निलंबित केले होते.

आता गीता, रितू आणि संगीताने माफी मागितल्याने त्यांना जकार्ता येथे रंगणाऱ्या एशियाडसाठी घेण्यात येणाऱ्या ट्रायल्समध्ये भाग घेता येईल. सध्या सुरू असलेले राष्ट्रीय शिबीर २५ जूनपर्यंत रंगणार आहे. भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या मते, बबिताला एशियाडसाठी रंगणाऱ्या ट्रायल्समध्ये भाग घेण्याची परवानगी नसेल. त्यामुळे आता तिला एशियाडमध्येही भाग घेता येणार नाही. बबितासह बंदी घालण्यात आलेल्या सहा मल्लांनी अद्याप माफी मागितलेली नाही. पूजा तोमर (६२ किलो), मंजू (६२), अंजू (६५), कामिनी (७२) तसेच पुरुषांच्या फ्रीस्टाइलमधील श्रवण (६१) यांच्यावरील शिबिरबंदी कायम आहे.

तसेच रितू, संगीता आणि गीतासह इंदू चौधरी (५०), रविता (५९), नंदिनी सलोखे (६२), रेश्मा माने (६२), मनू तोमर (७२) तसेच सत्यव्रत काडियन (९७) यांनी माफी मागितली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज