अ‍ॅपशहर

पेससह खेळावेच लागेलमहासंघाचा बोपण्णाला इशारा

संघनिवडीत खेळाडूंचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा संदेश भारतीय टेनिस महासंघाने दिला असून आगामी डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात लिअँडर पेसचा समावेश करून रोहन बोपण्णाच्या यासंदर्भातील आक्षेपांना महासंघाने विचारात घेतलेले नाही. पाच सदस्यांच्या निवड समितीने युकी भांबरी, रामकुमार रामनाथन, सुमित नागल, रोहन बोपण्णा व पेस यांचा समावेश भारतीय संघात केला आहे. राखीव खेळाडू म्हणून दिवीज शरण यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. कॅनडाविरुद्ध खराब कामगिरी करणाऱ्या पुरव राजा याला मात्र संघात स्थान मिळालेले नाही.

Maharashtra Times 12 Mar 2018, 3:00 am

डेव्हिस चषकात पेससह खेळण्यास बोपण्णा अनुत्सुक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम aita ignores rohan bopannas reservation pairs him with leander paes
पेससह खेळावेच लागेलमहासंघाचा बोपण्णाला इशारा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

संघनिवडीत खेळाडूंचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा संदेश भारतीय टेनिस महासंघाने दिला असून आगामी डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात लिअँडर पेसचा समावेश करून रोहन बोपण्णाच्या यासंदर्भातील आक्षेपांना महासंघाने विचारात घेतलेले नाही. पाच सदस्यांच्या निवड समितीने युकी भांबरी, रामकुमार रामनाथन, सुमित नागल, रोहन बोपण्णा व पेस यांचा समावेश भारतीय संघात केला आहे. राखीव खेळाडू म्हणून दिवीज शरण यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. कॅनडाविरुद्ध खराब कामगिरी करणाऱ्या पुरव राजा याला मात्र संघात स्थान मिळालेले नाही.

चीनशी भारताची गाठ ६ व ७ एप्रिलला तियानजिन येथे पडणार आहे.

भारतीय संघाचा न खेळणारा कर्णधार महेश भूपतीने निवड समितीच्या अध्यक्षांना पत्र लिहून कळविले होते की, चीनविरुद्धच्या या सामन्यात रोहन बोपण्णा पेससह खेळू इच्छित नाही.

पण निवड समितीने बोपण्णा आणि पेस दोघांचाही या संघात समावेश केला आहे आणि आता जर बोपण्णाला खेळायचे नसेल तर त्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी त्याच्यावरच सोपविली आहे.

टेनिस महासंघाच्या पदाधिकाऱ्याने यासंदर्भात सांगितले की, कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयाची चर्चा झाली. भूपतीच्या मते पेसनेच बोपण्णाचे मन या लढतीसाठी वळवावे. त्यासाठी पेसने बोपण्णाशी संपर्क साधायला हवा. बोपण्णाला सरकारकडून अनुदान मिळते. जर तो वैयक्तिक मतभेदासाठी खेळण्यास नकार देत असेल तर महासंघ त्याच्या पाठिशी उभा राहणार नाही. एकतर या खेळाडूंना भारतीय संघातून वर्षात दोन किंवा तीनवेळा खेळावे लागते. दोन आठवड्यांसाठी ते मतभेद विसरू शकत नाहीत का ?

लंडन ऑलिम्पिकमध्ये बोपण्णा आणि पेस एकत्र खेळणार होते पण नंतर बोपण्णाने खेळण्यास नकार देत भूपतीसह खेळायला मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. शेवटी पुरुष दुहेरीत विष्णूवर्धन याच्यासह पेसला खेळावे लागले. तर मिश्र दुहेरीत सानिया मिर्झासह पेस खेळला. पण सानियानेही त्यावर नाराजी प्रकट केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज