नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग संघटनेकडून जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या अमित पंघलची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. अमितने ४९ किलो गटाच्या अंतिम फेरीत ऑलिंपिक चॅम्पियन हसनबॉयला पराभूत करून सुवर्णयश मिळवले आहे. संघटनेकडून सोनिया लॅथर आणि गौरव बिधुरी यांचीही शिफारस केली होती. २२ वर्षीय अमिने याबाबत आनंद व्यक्त केला आहे. अमितने २०१७मध्ये आशइयाई अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले आहे. हरियाणाच्या अमितने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
अमितची ‘अर्जुन’साठी शिफारस
भारतीय बॉक्सिंग संघटनेकडून जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या अमित पंघलची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली...
Maharashtra Times 12 Sep 2018, 4:00 am