औरंगाबाद : राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत बीएसबीए स्कूलच्या आर्यन जैनने दोन सुवर्णपदके जिंकली. आर्यनने पाच ते सहा वर्षांखालील गटात ४०० मीटर रिले स्केटिंग रेस व फॅन्सी इनलाइन स्केटिंग या दोन प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई केली. मुख्याध्यापिका अवनी पटेल यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. आर्यनला प्रशिक्षक भिकन अंबे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या स्पर्धेत तीनशेपेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग होता. विभागीय क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आर्यन जैनला दोन सुवर्ण
राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत बीएसबीए स्कूलच्या आर्यन जैनने दोन सुवर्णपदके जिंकली...
Maharashtra Times 14 Jul 2018, 4:00 am