अ‍ॅपशहर

IND vs PAK : भारताने पाकिस्तानवर मिळवला धडाकेबाज विजय, पटकावले मानाचे पदक

भारताच्या हॉकी संघाने खेळ करत पाकिस्तानला पराभूत केले. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आजच्या महत्वाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आणि मानाचे पदक पटकावल्याचे पाहायला मिळाले. भारताने या सामन्यात कसा विजय मिळवला, पाहा...

Maharashtra Times 22 Dec 2021, 5:43 pm
मुंबई : भारताच्या हॉकी संघाने पाकिस्तानवर धडाकेबाज विजय आपल्या चाहत्यांना आज एक आनंदाची बातमी दिली. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अखेरच्या मिनिटापर्यंत चांगलाच रंगला होता. पण अखेर भारताने पाकिस्तानवर दमदार विजय मिळवत पदकाला गवसणी घातली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भारतीय हॉकी

भारताच्या संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला, त्यामुळेच त्यांना पहिल्याच मिनिटाला तीन पेनेल्टी कॉर्नर मिळवता आले. भारताच्या मनप्रीत सिंगने त्यानंतर दुसऱ्या मिनिटांला मिळालेल्या पेनेल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये केले आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. भारताने काही काळ ही आघाडी कायम ठेवली होती. पण पहिल्या सत्राच्या अखेरीस पाकिस्तानने गोल केला आणि भारताबरोबर १-१ अशी बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानकडून हा गोल अफरोझने केला. दुसऱ्या सत्रात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी गोल करण्याच प्रयत्न केले खरे, पण त्यांना यामध्ये अपयश आले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत हा सामना १-१ असा बरोबरीत राहीला होता. तिसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या संघाने जोरदार आक्रमण केले आणि त्याचा फायदा त्यांना झाल्याचे पाहायला मिळाले. कारण तिसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या अब्दुल राणाने पेनेल्टी कॉर्नरवर गोल केला आणि संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडेलला भारतीय संघ त्यांना जास्त आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताने त्यानंतर दोन गोल करत दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.

भारतीय संघ या स्पर्धेसाठी जेतेपदाचा दावेदार समजला जात होता. पण या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला जपानकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने जपानला ६-० असे पराभूत केले होते. पण जपानने उपांत्य फेरीत या पराभवाचा बदला घेतला आणि भारताचे जेतेपदाचे स्वप्न भंगल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर आज झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मात्र भारताने दमदार कामगिरी केली आणि या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

महत्वाचे लेख