अ‍ॅपशहर

बजरंग महागडा भारतीय मल्ल

स्टार मल्ल योगेश्वर दत्तने प्रो कुस्ती लीगच्या दुसऱ्या हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारी झालेल्या या लीगच्या लिलावात त्याचा विचार झाला नाही. पण दिल्ली संघाच्या बजरंग पुनियाने भारतीय मल्लांपैकी सर्वाधिक रकमेची बोली मिळविली.

Maharashtra Times 17 Dec 2016, 2:00 am
नवी दिल्ली : स्टार मल्ल योगेश्वर दत्तने प्रो कुस्ती लीगच्या दुसऱ्या हंगामात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारी झालेल्या या लीगच्या लिलावात त्याचा विचार झाला नाही. पण दिल्ली संघाच्या बजरंग पुनियाने भारतीय मल्लांपैकी सर्वाधिक रकमेची बोली मिळविली. त्याला ३८ लाख मिळाले. रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा जॉर्जियाचा मल्ल व्लादिमिर खिनशेगासविली याने सर्व मल्लांत आघाडी घेत ४८ लाखांची बोली जिंकली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bajarang punia won 38 lakhs in wrestling auction
बजरंग महागडा भारतीय मल्ल


दिल्लीने महिलांत मारिया स्टाडनिकवर ४७ लाख खर्च करण्याची तयारी दर्शविली. ती सर्वात महागडी महिला कुस्तीगीर ठरली. भारतीय महिलांमध्ये साक्षी मलिकलाही मागे टाकत रितू फोगटने ३६ लाखांची बोली जिंकली. गीता, बबिता, रितू व संगीता या फोगट भगिनींनी एकूण ७० लाखांची बोली मिळविली. भारताचा आघाडीचा मल्ल सुशीलकुमार आधीच या लीगमधून बाहेर पडला आहे आता योगेश्वरचीही अनुपस्थिती जाणवणार आहे. रशियाचा जगज्जेता मगोमद कुर्बानेलीव्ह याने ४७ लाखांची कमाई केली. मुंबई, दिल्ली, पंजाब, जयपूर, उत्तर प्रदेश व हरयाणा अशा सहा शहरांचे संघ या लीगमध्ये असतील. प्रत्येक संघात ९ कुस्तीगीरांचा समावेश असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज