अ‍ॅपशहर

बार्सिलोनाला विजेतेपद

बार्सिलोना संघाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी बार्सिलोना संघाने कँप नोऊ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लेव्हांटे संघावर १-० अशा गोलफरकाने मात केली.

महाराष्ट्र टाइम्स 29 Apr 2019, 4:00 am
बार्सिलोना : बार्सिलोना संघाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाचे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी बार्सिलोना संघाने कँप नोऊ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लेव्हांटे संघावर १-० अशा गोलफरकाने मात केली. या सामन्याच्या उत्तरार्धात ६२ व्या मिनिटास लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाचा एकमेव गोल केला. या विजयाबरोबरच बार्सिलोना संघाचे ३५ सामन्यांअखेर ८३ गुण झाले असून गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अॅटलेटिको माद्रिद संघाचे ७४ गुण आहेत. बार्सिलोना संघाने एकूण २६ व्यांदा ही स्पर्धा जिंकली असून, मागील ११ मोसमांतील संघाचे हे आठवे विजेतेपद आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम barcelona defeat levante to secure la liga title
बार्सिलोनाला विजेतेपद


किपचॉग, कॉसगेई विजेते

लंडन : केनियाचा धावपटू एलिउद किपचॉगने रविवारी चौथ्यांदा लंडन मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले. ३४ वर्षीय किपचॉगने मॅरेथॉनचे ४२.२ किलोमीटरचे अंतर २ तास २ मिनिटे ३७ सेकंदांमध्ये पूर्ण केले. किपचॉगने मागील वर्षी बर्लिन मॅरेथॉनमध्ये २ तास १ मिनिट ३९ सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली होती. त्यानंतर मॅरेथॉनमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ ठरली. महिला गटात केनियाच्या ब्रिगिड कॉसगेई विजेती ठरली. तिने २ तास १८ मिनिटे १९ सेकंदांमध्ये मॅरेथॉन पूर्ण केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज