अ‍ॅपशहर

'करोना'च्या धसक्याने ऑलिम्पिकच्या ऑफिसला टाळं

सध्याच्या घडीला करोना व्हायरसचा फटका जगभरात बसत आहे. टोकिओमधील ऑलिम्पिकबाबत आपल्याला काल मोठी अपडेट समजली होती. आता भारताच्या ऑलिम्पिक संघटनेने करोना व्हायरसच्या प्रसारामुळे आपले ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2020, 3:50 pm
'करोना' व्हायरसचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. यामध्ये क्रीडा संघटनाही मागे नाहीत. 'करोना' व्हायरसच्या भितीमुळे आज भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपल्या ऑफिसला टाळं लावलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian olympic

वाचा-पाकिस्तानमध्ये १२८ खेळाडूंची झाली 'करोना' चाचणी

ऑलिम्पक ही स्पर्धा चार वर्षांनी खेळवली जाते. ही स्पर्धा २०२० साली जपानमधील टोकिओ या शहरात होणार आहे. ही स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिकची तयारी आता करावी लागणार आहे. पण करोनापासून वाचण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपल्या ऑफिसला टाळं लावण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाबाधित लोकांची संख्या भारतामध्येही वाढताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपले ऑफिस बंद केले आहे. त्याचबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांना घरामधून काम करण्यास सांगितले आहे.

जगभरातील जवळपास सर्व देशात करोना रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार १४१ हून अधिक देशात करोना व्हायरस पसरला आहे. भारतात १०७ लोकांना याची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे जगभरात ७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अन्य क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्रावर करोनाचा परिणाम दिसत आहे. अनेक स्पर्धा रद्द किंवा स्थगित केल्या गेल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज