अ‍ॅपशहर

भारतीय महिला खेळाडूने जमा केले १ कोटी २५ लाख!

करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक स्वरुपात मदत करण्यास सुरूवात केली. भारताच्या स्टार टेनिसपटूने करोनाविरुद्धच्या लढाईत १ कोटी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2020, 1:43 pm
नवी दिल्ली: करोनाविरुद्धच्या लढाईत क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक जण स्वत:चे योगदान देत आहे. भारतात करोना रुग्ण आढळल्यानंतर केंद्राने सर्वांना घरी राहण्याचे आवाहन केले होते. तेव्हा सर्व खेळडू सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना घरी राहण्याचे आणि सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगत होते. त्यानंतर करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक स्वरुपात मदत करण्यास सुरूवात केली. भारताच्या स्टार टेनिसपटूने करोनाविरुद्धच्या लढाईत १ कोटी २५ लाख रुपयांची मदत गोळा केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम help


वाचा- करोनाविरुद्धच्या लढाईत हिटमॅनकडून ८० लाख!

करोना व्हायरसविरुद्ध संपूर्ण देश एकजूट होऊन लढत आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील खेळाडू देखील यात मागे नाहीत. कोणी त्यांचा पगार तर कोणी काही लाखांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना मदत देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. यासाठी पीएम केअर्स फंड तयार करण्यात आला आहे.

वाचा- ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती करतेय करोनाग्रस्तांची सेवा

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी १.२५ कोटी रुपये जमा केले आहेत. करोना लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्यांसाठी गेल्या आठवड्यात आम्ही काही मदत केली होती. काही हजार कुटुंबांना आम्ही मदत केली. आता या आठवड्यात १.२५ कोटी रुपये जमा केले आहेत. यामुळे एक लाख लोकांना मदत होईल. आपल्याला एकत्रपणे हा प्रयत्न करायचा आहे, असे सानियाने म्हटले आहे.

वाचा- टोकिओ ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर!


सानियाच्या आधी भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने १० लाख तर फिरकीपटू पूनम यादवने दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मितालीने पंतप्रधान निधीसाठी ५ लाख तर मुख्यमंत्री निधीत ५ लाख रुपये दिले होते. भारतीय संघातील अष्ठपैलू दिप्ती शर्माने दीड लाख तर भारतीय क्रीडा प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचे वेतन (७६ लाख) रुपये करोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज