अ‍ॅपशहर

मनिका, हरमितची 'अर्जुन'साठी शिफारस

टेबल टेनिस फेडरेशनने प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत चार पदकांची घसघशीत कमाई करणारी खेळाडू मनिका बात्रा हिची शिफारस केली आहे.

Maharashtra Times 21 Apr 2018, 2:17 am
नवी दिल्ली : टेबल टेनिस फेडरेशनने प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत चार पदकांची घसघशीत कमाई करणारी खेळाडू मनिका बात्रा हिची शिफारस केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manika-batra


टेटे फेडरेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गोल्ड कोस्ट येथे तिने केलेल्या दमदार कामगिरीनंतर शासनाच्या समितीला तिला दुर्लक्षित करणे कठीण आहे. आम्ही तिच्या नावाची शिफारस पाठविली आहे.

गोल्ड कोस्टमध्ये मनिकाने एकहाती खेळ करत सांघिक सुवर्ण जिंकून दिले. तिने सिंगापूरच्या फेंग या खेळाडूला पराभूत करण्याची किमया दोनवेळा केली. महिला दुहेरीचे रौप्यही तिच्यामुळे भारताला मिळाले. मौमा दाससह ती महिला दुहेरीत खेळली. त्यानंतर साथियनसह तिने मिश्र दुहेरीत ब्राँझ पटकाविले.

आता २९ एप्रिलपासून स्वीडनला होत असलेल्या जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत ती खेळणार आहे. टेटेपटू हरमित देसाई, ज्याने राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली, त्याच्या नावाचीही शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज