अ‍ॅपशहर

दहिसर विद्यामांदिरला मल्लखांबचे विजेतेपद

दहिसर विद्यामंदिरने ३९व्या प्रबोधन आंतरशालेय मल्लखांब स्पर्धेत ९८.१९ गुणांसह सांघिक विजेतेपदाचा मान पटकावला, तर महात्मा गांधी विद्यालयाला (८४.६७ गुण) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Maharashtra Times 8 Dec 2016, 4:00 am
मुंबई : दहिसर विद्यामंदिरने ३९व्या प्रबोधन आंतरशालेय मल्लखांब स्पर्धेत ९८.१९ गुणांसह सांघिक विजेतेपदाचा मान पटकावला, तर महात्मा गांधी विद्यालयाला (८४.६७ गुण) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दहिसर विद्यामंदिरच्या तरुण मल्ल्या याने १२ वर्षा खालील मुलांमध्ये ७.२५ गुणांसह सुवर्ण पदक पटकावले तर त्याच गटात शार्दुल ऋषिकेश याने रौप्य तर श्रावण सटवे याने ब्राँझपदक मिळविले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dahisar club won mallakhamb
दहिसर विद्यामांदिरला मल्लखांबचे विजेतेपद


स्वामी विवेकानंद शाळेच्या निधी राणे हिने १४ वर्षाखालील मुलींमध्ये ८.०० गुणांसह सुवर्ण पदकाला गवसणी घातली तर मृदुल सैतवडेकर हिने ७.८० गुणांसह रौप्य पदक मिळविले. हर्षित वायंगणकर आणि ऋतुजा मांडवेकर यांनी ७.४० असे समान गुण मिळविल्याने या दोघीनाही ब्राँझपदक देण्यात आले. १६ वर्षाखालील मुलींमध्ये जान्हवी जाधव हिने या स्पर्धेतील सर्वाधिक ८.२० गुणांसह सुवर्ण विजेती कामगिरी केली. त्यामागोमाग श्रुती उत्तेकर आणि प्रांजली सावंत यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळविले. १६ वर्षाखालील मुलांमध्ये शबिब दामाद या लीलावती पोदारच्या मुलाने ७.९० गुणांसह प्रथम तर अथर्व आंग्रे आणि समर्थ राणे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची कामगिरी केली. या स्पर्धेत ७५ शाळांमधील १७० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

अंतिम निकाल : मुली : १२ वर्षाखालील : १. सृष्टी शर्मा (७.४०) २, सारा शहा (७.००) ३. तनश्री जाधव (६.७०). १४ वर्षाखालील : १. निधी राणे (८.००), २. मृदुल सैतवडेकर (७.८०), ३. हर्षित वायंगणकर व ऋतुजा मांडवेकर (७.४०). १६ वर्षाखालील : १. जान्हवी जाधव (८.२०) २. श्रुती उत्तेकर (७.७०), ३. प्रांजली सावंत (७.५०) मुले : १२ वर्षाखालील : १. तरुण मल्ल्या (७.२५), २. शार्दुल ऋषिकेश (७.१५), ३. श्रावण सटवे (७.१०). १४ वर्षाखालील : १. अवधूत पिंगळे (७.६३), २. ध्रुव पटलेकर (७.३६), ३. गौरीश साळगावकर (७.१५). १६ वर्षाखालील : १. शबिब दामाद (७.९०), २. अथर्व आंग्रे (७.७०), ३. समर्थ राणे (७.४०)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज